Baban Gholap News : धक्कादायक! घोलपांचे राजकीय भवितव्य पुन्हा टांगणीला... हे आहे कारण...

Babanrao Gholap माजी मंत्री घोलप यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि दंड याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते.
Ex Minister Babanrao Gholap
Ex Minister Babanrao Gholapsarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics News : शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांना एका खटल्यात झालेल्या शिक्षेच्या अपिलावरील सुनावणी आज होऊ शकली नाही. त्यामुळे श्री घोलप लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, हा निर्णय लांबला आहे. माजी मंत्री घोलप यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि दंड याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलावर गेली काही वर्षे सुनावणी सुरू आहे. त्याचा अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

ज्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र, आज सुनावणीसाठी असलेल्या अपील न्यायमूर्ती कर्णिक यांच्या न्यायालयात होते. आजच्या सुनावणीसाठीच्या खटल्यांची संख्या मोठी होती. बबनराव घोलप यांच्या खटल्याचा क्रम २६ होता. त्यात बराच कालापव्यय होणार असल्याने आजची सुनावणी होऊ शकली नाही. आता या खटल्यावर येथे २८ मार्चला सुनावणी होईल.

माजी मंत्री घोलप यांना एका खटल्यात शिक्षा आणि दंड झालेला आहे. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे घोलप यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज निर्णय अपेक्षित होता. मात्र, हा निर्णय न झाल्याने घोलप यांनी निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत लांबणीवर गेला आहे.

Ex Minister Babanrao Gholap
Solapur Shivsena : शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख अडचणीत; वाहन विक्रेत्याच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. अशा स्थितीत घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याने त्यांच्या राजकीय करिअरसाठी आता 28 मार्च ही तारीख निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. घोलप यांनी नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.

उपनेते असलेले घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक जबाबदारीदेखील पक्षासाठी पार पाडलेली आहे. या मतदारसंघातील अंतर्गत राजकारण आणि नियुक्त्या यावरून मतभेद झाल्याने घोलप यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Ex Minister Babanrao Gholap
Nashik News : भुजबळांनंतर मुलालाही मराठा समाजाच्या रोषाला जावं लागलं सामोरे; ताफा अडविण्याचा प्रयत्न अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com