Dr Rahul Aher Politics: आमदार राहुल आहेर समर्थक नाराज, आज फडणवीस यांना भेटणार.

Rahul Aher Decides Not to Contest Chandwad-Deola Assembly Seat: चांदवड-देवळा मतदार संघातून भाजपचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Dr Rahul Aher, Devendra Fadanvis & Keda Aher
Dr Rahul Aher, Devendra Fadanvis & Keda AherSarkarnama
Published on
Updated on

Dr. Rahul Aher News: चांदवड- देवळा मतदारसंघात आमदार डॉ राहुल आहेर उमेदवारी करणार नाहीत. त्यांच्या या घोषणेने मतदारसंघातील राजकारणाने यू टर्न घेतला आहे. भाजपचे कार्यकर्ते या नव्या भूमिकेने गोंधळले आहेत.

चांदवड- देवळा मतदारसंघातून डॉ राहुल आहेर भाजपचे दोन टर्म आमदार आहेत. मात्र यंदा त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच विरोध झाला. नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे कौटुंबिक वाद टाळण्यासाठी आमदार डॉक्टर आहेर यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार डॉ आहेर यांच्या या निर्णयाने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

पक्षाने विद्यमान आमदार डॉ आहेर यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा पक्षाच्या जागेला धोका निर्माण होईल. अशी या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. विद्यमान आमदारांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी असा त्यांचा आग्रह आहे.

Dr Rahul Aher, Devendra Fadanvis & Keda Aher
Seema Hire Politics: भाजप इच्छुक एकवटले, पश्चिम मधून नवीन चेहरा देण्याची मागणी!

या मतदारसंघातून प्रहार संघटनेने गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते तिसरी आघाडीचे उमेदवार असतील. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल, बाजार समितीचे सभापती संजय जाधव हे प्रमुख इच्छुक आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

महाविकास आघाडी कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची देखील सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यात महाविकास आघाडीचे यंत्रणा प्रबळ आहे.

केदा आहेर हे देवळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. भाजपकडून केदा आहेर यांना उमेदवारी मिळाल्यास चांदवडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. या मतदारसंघात गेल्या वर्षभर कांदा निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वातावरण तापलेले आहे.

Dr Rahul Aher, Devendra Fadanvis & Keda Aher
Dada Bhuse : 'त्या' व्हायरल व्हिडिओने दादा भुसेंच्या अडचणीत वाढ?... सुरू झाली धावपळ!

मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ भारती पवार या आघाडीवर होत्या. या संधीचा लाभ घेण्यासाठी भाजपने उमेदवार ठरवताना या सर्व राजकीय स्थितीचा विचार करावा. यासाठी पक्षावर दबाव निर्माण झाला आहे.

आमदार डॉ आहेर यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने या मतदारसंघातील राजकारण अचानक बदलले आहे. आता महाविकास आघाडीचे इच्छुक अधिक आक्रमकपणे प्रचार करीत आहेत. त्या दृष्टीने भाजपचे केदा आहेर हे काय भूमिका घेतात आणि प्रचारातील धोरण काय असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com