Dada Bhuse : 'त्या' व्हायरल व्हिडिओने दादा भुसेंच्या अडचणीत वाढ?... सुरू झाली धावपळ!

Dada Bhuse Viral Video: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांना मतदारसंघात अडचण करणारा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
Dada Bhuse, Malegaon
Dada Bhuse, MalegaonSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News: नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या सहकाऱ्यांनीच एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांना त्यांचा जवळचा सहकारी सोडून गेला आहे. आता त्यांना नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मतदारसंघात सहकारी भाजपनेच एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे.

त्याची जोरदार चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही त्या व्हिडिओला पाठिंबा दिल्याने मंत्री भुसे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. त्यांचे समर्थक व कार्यकर्ते त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त झाले आहेत.

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांच्या भावना आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री भुसे यांना कोणतेही सहकार्य करणार नाही. त्यांच्यापुढे पर्याय उभा केला जाईल, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.

Dada Bhuse, Malegaon
MLA Rahul Aher : आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार, केदा आहेर यांची केली शिफारस

भारतीय जनता पक्षाची बूथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख अशी मोठी यंत्रणा मालेगावमध्ये आहे. भाजपला मानणारा आणि पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांचे मतदान आहे. मात्र पालकमंत्री भुसे यांना भाजपचे मतदान चालते, त्यांचा कार्यकर्ता मात्र चालत नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

प्रत्येक वेळेत कोणत्याही निवडणुकीत काम करताना करताना भाजपला सापत्न वागणूक दिली जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात नाही. त्यांना उमेदवारी हवी असल्यास शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची सक्ती केली जाते.

भाजपचा उमेदवार असल्यास त्याच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा केला जातो. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले जात नाही. मोजक्या एक-दोन कार्यकर्त्यांना कंत्राटे देऊन खुष केले जाते. हे दोन कार्यकर्ते म्हणजे भाजप नव्हे, असे मंत्र्यांना सुनावले आहे.

Dada Bhuse, Malegaon
Hiraman Khoskar Politics: बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांच्या आरोपाने उडाली खळबळ, म्हणाले...

आगामी निवडणुकीत भाजप म्हणजे काय हे दाखवून दिले जाईल, असा इशारा या व्हि़डिओमध्ये दिला आहे. भाजपच्या विरोधात षडयंत्र करणारे पालकमंत्री भुसे यांच्या प्रचारात कोणीही सहभागी होणार नाही. त्यांच्या पालखीला भाजपचा एकही भोई नसेल. असा थेट इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे.

यासंदर्भात भाजप नेते सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा व्हिडिओ मी पाहिला आहे, असे सांगितले. त्या व्हिडिओतील भावना तंतोतंत खऱ्या आहेत. त्या दृष्टीने भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजप आपली ताकद पालकमंत्री भुसे यांना दाखवून देण्याच्या मनस्थितीत आहे, असे त्यांनी `सरकारनामा`ला संगीतले.

मालेगाव शहर आणि बाह्य मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांच्या भावना या शीर्षकाचा हा व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांना सहकार्य केले जात नाही. मग महायुती फक्त विधानसभा निवडणुकीसाठीच असते का? युतीचा धर्म भाजपनेच पाळायचा असतो का? यंदा तसे होणार नाही.असा थेट इशारा या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे खडबडून जागे झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दूर करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com