Seema Hire Politics: भाजप इच्छुक एकवटले, पश्चिम मधून नवीन चेहरा देण्याची मागणी!

BJP Cadre Rejects MLA Seema Hire Nomination : आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या इच्छुकांचा एकमुखी विरोध.
MLA Seema Hire
MLA Seema HireSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics: विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भाजप उमेदवारीसाठी नवे प्रयोग करीत आहे. त्यामुळे पक्षाच्या इच्छुकांमध्येही आता उत्साह आहे. नाशिक शहरातील भाजपच्या आमदारांना उमेदवारी जाहीर होता होता त्याचा त्रास होऊ लागला आहे.

भाजपकडून यंदा हरियाणा पॅटर्न राबविला जाणार आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना वाटते आहे. त्याचा परिणाम म्हणजे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघातील सर्वच इच्छुक काल एकत्र आले. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला एकमुखी विरोध केला. गेली दहा वर्ष आमदार हिरे यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता बदल अपेक्षित आहे.

या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांची ही अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे पक्षाने इच्छुकांच्या मागणीचा विचार करावा, असे यावेळी ठरले. इच्छुकांच्या या भावना वरिष्ठ नेत्यांना पोहोचविण्यात आल्या आहेत.

MLA Seema Hire
Dada Bhuse : 'त्या' व्हायरल व्हिडिओने दादा भुसेंच्या अडचणीत वाढ?... सुरू झाली धावपळ!

गुरुवारी रात्री झालेल्या या बैठकीला पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी देखील उपस्थित होते. माजी नगरसेवक दिनकर पाटील, शशिकांत जाधव, मुकेश शहाणे, सतीश बापू सोनवणे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, कैलास अहिरे, विक्रम नागरे, बाळासाहेब पाटील, स्वप्निल पाटील, जगन पाटील आदी इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते.

आमदार हिरे गेली दहा वर्ष नाशिक पश्चिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र दोन टर्म आमदार असूनही त्यांना मतदारांवर प्रभाव पाडता आलेला नाही. त्यांच्याकडून लक्षणीय कामे झाली नसल्याची तक्रार पक्षाच्या इच्छुकांनी केली.

महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी थेट पक्षविरोधी भूमिका घेतली होती. गेल्या दहा वर्षात पक्षाच्या विस्तारासाठी त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. या मतदारसंघात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. एकही नवा उद्योग आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.

MLA Seema Hire
MLA Rahul Aher : आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार, केदा आहेर यांची केली शिफारस

त्यामुळे विद्यमान आमदारांनी आता स्वतःहून थांबले पाहिजे. पक्षाकडे कार्यक्षम आणि प्रभावी इच्छुक आहेत. त्यांना आता संधी दिली पाहिजे. फार काळ निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलने योग्य नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सर्व इच्छुक एकत्र आल्याने विद्यमान आमदार हिरे यांची डोकेदुखी वाढली आहे. या इच्छुकांनी उमेदवारीच्या अपेक्षेने आमदार हिरे यांच्या विरोधातच मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे नेते काय भूमिका घेतात, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com