

Bangladeshis accused of filling voter forms: 'SIR'साठी आठ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाची जेवढी नजर आहे, तेवढी सत्ताधारी आणि विरोधकांची देखील आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वर्धा येथे दौऱ्यात, या प्रक्रियाबाबत खळबळजनक दावे केला आहे.
भाजपचे (BJP) किरीट सोमय्या यांनी, महाराष्ट्रात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक कथित बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र (इन्यूमरेशन फॉर्म) भरले आहेत, असा दावा केला आहे. मशिदींमधून मोठ्या प्रमाणात बोगस इन्यूमरेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
'SIR' प्रक्रियेदरम्यान मशिदींमधून मोठ्या प्रमाणात बोगस गणना पत्र भरले जात आहेत असे सांगताना, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथेही आठ हजार, जे येथे वास्तव्यास नसून मूळचे बांगलादेशातील आहेत, त्यांनी गणना पत्र भरल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला. या सर्व प्रक्रियेवर आम्ही आक्षेप नोंदवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकही बांगलादेशी मतदार राहू देणार नाही, असा निर्धार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. एसआयआरचे काम अंतिम टप्प्यात असून, गणना पत्र भरण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक आहे.
अद्याप सुमारे 30 टक्के मतदारांनी आपले फॉर्म भरले नसल्याचे सांगत, सर्व पात्र मतदारांनी लवकरात लवकर आपले गणना पत्र भरावे, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.