Kirit Somaiya Politics: आमदार मौलाना मुक्ती यांचा किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार, दिले ‘हे’ आव्हान!

Kirit Somaiya; MLA Maulana Mukti's counterattack on Kirit Somaiya-मालेगावात निवडणुकीदरम्यान आलेल्या निधीची सरकार गांभिर्याने चौकशी का करीत नाही?.
Kirit Sommaiya & Maulana Mufti
Kirit Sommaiya & Maulana MuftiSarkarnama
Published on
Updated on

MIM Maulana Mufti News: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी सबंध यंत्रणा कामाला लावली होती. पोलिसांचे विशेष तपास पथक देखील काम करीत आहे.

मालेगावातील बांगलादेशी नागरिक आणि व्होट जिहाद या प्रश्नावर आमदार मुफ्ती इस्माईल यांनी विधिमंडळात आवाज उठवला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले. सोमय्या यांना त्यांनी चक्क आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले.

Kirit Sommaiya & Maulana Mufti
Hasan Mushrif News : वैद्यकीय विद्यार्थी चिंतेत अन् मंत्री हसन मुश्रीफ मात्र निश्चिंत?

माजी खासदार सोमय्या यांनी तीन ते चार वेळा मालेगाव चा दौरा केला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मालेगावातील बांगलादेशी नागरिकांच्या तपासासाठी विनंती केली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक नियुक्त झाले. या पथकाने आतापर्यंत तीन हजार नागरिकांची चौकशी केली आहे.

Kirit Sommaiya & Maulana Mufti
MVP Grant scam: लाडका भाऊ...नाशिकच्या या संस्थेत मोठ्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

या चौकशीत एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही. या संदर्भात आमदार मुफ्ती यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सोमय्या यांनी मालेगावातील झोपडपट्टी आणि गरीब लोकांची वस्ती पाहून ते सर्व बांगलादेशी आहेत, असा निष्कर्ष काढला. त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे काही लोकांकडील कागदपत्रांत संदर्भ चुकले असल्याने त्यांच्यावर कारवाई देखील झाली आहे. मालेगावला राजकीय दृष्ट्या अशी वागणूक योग्य नाही.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मालेगावच्या बँकेत मोठ्या प्रमाणावर निधी आला. हा निधी वोट जिहादसाठी आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची पुरेशी चौकशी का झाली नाही?. चौकशीत काय आढळले? हे यंत्रणा का सांगत नाही? असा गंभीर प्रश्न आमदार मुफ्ती यांनी केला.

या निमित्ताने मालेगावातील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आणि त्यावरून राजकारण तापविण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या निमित्ताने आमदार मौलाना मुफ्ती यांनी थेट सोमय्या यांनाच आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे किरीट सोमय्या हे देखील सध्या या विषयावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com