Kirit Somaiya Politics: किरीट सोमय्या यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संबंध मालेगावशी जोडला, काय आहे प्रकरण?

Kirit Somaiya;BJP's Kirit Somaiya linked the Pahelgam incident with Malegaon Fake birth certificates-मालेगाव येथे बनावट दाखले प्रकरणी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya News: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मालेगाव शहराला टार्गेट केले आहे. आता त्यांनी महापालिका आणि महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीने चांगलीच खळबळ उडाली आहे

मालेगाव महापालिकेने कोणतेही अधिकृत कागदपत्र नसताना जन्मदाखले दिले आहेत. यामध्ये एक हजार ४४ जन्म दाखले संशयास्पद आहे. याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी गंभीर मागणी त्यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्या मागणीने मालेगाव शहरात आणि प्रशासनात तणावाचे वातावरण आहे.

माजी खासदार सोमय्या यांनी मालेगाव प्रकरणाचा संबंध थेट पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी जोडण्याचा प्रयत्न एक हजार ४४ जन्म दाखले शासकीय यंत्रणेने दिले. यांच्या आधारे ४० जणांनी पासपोर्ट तयार केला. हे चाळीस जण आता देशाबाहेर पळून गेले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya
Nashik Kumbh Mela : 2003 मध्ये जे झालं ते चुकूनही नको व्हायला, यावेळी कुंभमेळ्यात गर्दी टाळण्यासाठी कसं केलय नियोजन?

महापालिका आणि शासकीय यंत्रणांनी जन्मदाखले विलंबाने देण्याचे कोणतेही कारण नाही. या यंत्रणांनी मालेगाव शहरात बनावट कागदपत्रांच्या आणि कोणतेही वैध कागदपत्र नसताना जन्मदाखले दिले आहेत. या दाखल्यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो. पहलगाम सारख्या दहशतवादी घटना याच प्रकरणातून घडू शकतात. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

Kirit Somaiya
Dhule cash controversy: एकनाथ शिंदेच्या आमदाराच्या त्या ‘पीए’च्या खोलीत सापडले फायलींचे घबाड! काय आहे प्रकरण?

यासंदर्भात मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांना सक्तीचा राजावर पाठविण्यात यावे. दाखले देणाऱ्या अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. हे प्रकरण गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, तहसीलदार सोनवणे यांसह विविध अधिकाऱ्यांची चर्चा केली. सोमय्या यांनी आता थेट महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच देशद्रोही संबोधल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या या भूमिकेवर मालेगाव मध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले. किरीट सोमय्या 'गो बॅक' अशा घोषणा देण्यात आल्या. शहराचे माजी आमदार असिफ शेख आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. सोमय्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप आणि मालेगाव शहराला बदनाम करीत असल्याचा दावा या नेत्यांनी केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com