Kishor Patil : 'मला समजावू नका, तेवढी अक्कल माझ्यात आहे' ; गुलाबराव पाटलांची मध्यस्थी किशोर पाटलांना खटकली

Kishor Patil's Strong Statement Against Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असताना आमदार किशोर पाटील यांनी त्यांनाच सुनावल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
Gulabrao Patil , Kishor Patil
Gulabrao Patil, Kishor PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आमदार मंगेश चव्हाण व शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यातील तणाव वाढला आहे. मात्र, या वादात आता शिवसेना (शिंदे गटाचे) मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील या दोन आमदारांमध्ये जुंपली असल्याचे दिसून आले आहे.

आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर निर्माण झालेल्या वादात मध्यस्थीची भूमिका मांडणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाच आमदार किशोर पाटील यांनी थेट सुनावले आहे. "मला समजावण्याचा प्रयत्न करू नका; तेवढी अक्कल, बुद्धी आणि क्षमता माझ्यात आहे," अशा शब्दांत किशोर पाटील यांनी गुलाबरावांना ऐकवलं आहे.

किशोर पाटील यांनी केलेल्या या विधानाचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत. कारण मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेना (शिंदे गटातील) ज्येष्ठ नेते असून, ते जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. मात्र, किशोर पाटलांनी या वादात त्यांच्याच पक्षातील आमदाराने अर्थात गुलाबरावांनी मध्यस्थी करू नये, असे जाहीरपणे सांगितल्याने या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Gulabrao Patil , Kishor Patil
Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी! 12 उमेदवार बिनविरोध; शिवसेनेने मारली मोठी मुसंडी, भाजपलाही टाकलं मागे

आता आमदार किशोर पाटील यांनी मुलगा सुमित याच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. गुलाबराव पाटील असोत किंवा अन्य कोणीही आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करू नये, असं किशोर पाटील यांनी स्पष्ट केल्याने पक्षांतर्गत समन्वय साधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत वाढलेल्या तणावासोबतच आता शिवसेनेतील अंतर्गत मतभेदही उघडपणे समोर आले आहेत. यातून शिवसेनेतच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, किशोर पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील काय भूमिका घेतात त्यावर ते काय प्रत्युत्तर देतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Gulabrao Patil , Kishor Patil
Jalgaon DCC Bank Election : अदृश्य शक्तीची जादूही ठरली फेल, शिवसेना आमदार किशोर पाटलांनी करुन दाखवलं, मुलाची बिनविरोध निवड

नेमका वाद काय?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला होता. मीच सुरुवातीला अर्ज बाद करायला लावला त्यानंतर पुन्हा मीच अधिकाऱ्यांना सांगून अर्ज वैध केला अशी कबुली आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. त्यावर सुमीत पाटील यांनी चव्हाण यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरुन महायुतीत वातावरण तापले होते. हा वाद शमवण्यासाठी आणि दोन्ही बाजूंची समजूत काढण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत मध्यस्थीची भूमिका मांडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.