Amol Shinde Politics: भाजपच्या डावपेचांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील संकटात

Kishore Patil politics, BJP's Amol Shinde blocked MLA Kishore Patil's assembly path- शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात महायुतीचे दोन्ही पक्ष अपक्ष उमेदवारीच्या तयारीत
MLA Kishor Patil
MLA Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Pachora BJP News: निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या इच्छुकांच्या अपेक्षांनाही पंख फुटले आहेत. त्यामुळे महायुतीचे तिन्ही पक्षांचे इच्छुक एकमेकांच्या पायात पाय घालण्यासाठी सरसावले आहेत. त्यात पाचोरा विधानसभा मतदारसंघात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

महायुतीतील नेत्यांमधील मतभेदाचा सर्वात मोठा फटका विद्यमान आमदारांना बसणार आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे या वादाचे बळी ठरण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या दोन्ही पक्षांनी या मतदार संघात आपल्या उमेदवारीचा दावा ठोकला आहे. उमेदवारही निश्चित केले आहेत.

या उमेदवारीमुळे आधीच घरातूनच आव्हान मिळालेले आमदार पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत. आमदार पाटील यांचे जवळचे काही सहकारी त्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. या आव्हानांमुळे आमदार पाटील यांचे राजकीय भवितव्य खडतर होण्याची चिन्हे आहेत.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख अमोल शिंदे यांनी काल आपली उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. ही जागा पक्षाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MLA Kishor Patil
Dr Atmaram Kumbharde: भाजप नेते आत्माराम कुंभार्डे यांनी घातले काँग्रेसचे टी-शर्ट, म्हणाले, कोतवाल माझे गुरु!

भाजपला हा मतदारसंघ मिळाला नाही तर, आपण अपक्ष उमेदवारी करणार अशी घोषणा शिंदे यांनी केली. या घोषणामुळे महायुतीच्या राजकारणात मिठाचा खडा पडला आहे. या मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक आहेत. मात्र महायुतीतील विसंवाद टोकाला गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करू. यंदाची निवडणूक जिंकूच असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीच्या तीन पक्षांचे तीन प्रबळ उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

महायुतीचे सर्वच घटक पक्ष निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहेत. या विसंवादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या विधानसभेच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यातून वरिष्ठ नेते देखील इच्छुकांची कितपत समजूत घालू शकतील, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

MLA Kishor Patil
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह अजित पवारांकडे; आता आमदार दिलीप मोहितेंनी केला मोठा दावा

गेल्या निवडणुकीत अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांचा अवघ्या सतराशे मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यावेळी किशोर पाटील शेवटच्या फेरीत विजयी झाले. निवडणूक निकालानंतर गेली साडेचार वर्ष अमोल शिंदे भाजपच्या माध्यमातून मतदार संघात सक्रिय होते. त्यामुळे आपण यंदा किमान एक लाख मतांनी विजयी होऊ, असा त्यांचा विश्वास आहे.

मतदार संघातील राजकीय घडामोडींमध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यात आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. सध्या ते शिंदे गटात आहेत. शिंदे गटात गेल्याने त्यांच्या कुटुंबातीलच राजकीय मंडळी विरोधात गेली आहे. त्यात त्यांच्या भगीनीनेच आमदार पाटील यांना आव्हान दिले आहे.

MLA Kishor Patil
Sunil Tatkare On Ashutosh Kale : अजितदादा मुख्यमंत्री, तर आशुतोष काळेंना मंत्रिपद निश्चित; सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीचा मंत्री सांगितला

वैशाली सूर्यवंशी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीमती सूर्यवंशी यांना पाठिंबा दिला आहे. कार्यकर्तेही अतिशय जोमाने कामाला लागले आहेत. सध्या शिवसेना ठाकरे गटाने पाचोरा भडगाव मतदार संघात विजय खेचून आणायचं असा निर्धार केला आहे.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांना सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. मात्र काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात हा दावा कितपत टिकेल, हा चर्चेचा विषय आहे. एकंदरच पाचोरा भडगाव मतदार संघात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच उमेदवारांच्या राजकीय महत्वकांक्षेला घुमारे फुटले आहेत. त्यामुळे पाचोरा भडगाव मतदार संघ चर्चेत आला आहे. परस्परांतील विसंवादाचा मोठा फटका विद्यमान आमदार पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार पाटील यांच्या मार्गात स्वपक्षांनीच काटे पेरल्याचे चित्र आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com