Abdul Sattar News: कुंभारीचे तरुण शेतकरी म्हणाले, `गांजा शेतीची परवानगी द्या`

Angry Farmers: अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यात कुंभारीच्या शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांसमोर उद्विग्नता
Abdul Sattar with affected Farmers.
Abdul Sattar with affected Farmers.Sarkarnama
Published on
Updated on

Niphad News: अस्मानी, सुलतानी संकटांमुळे शेतकरी (Farmers) पुर्णतः मेटाकुटीला आला आहे. नुकसान भरपाई वेळेवर दिली जात नाही. अशा परिस्थितीत सरकारने (Maharashtra Government) गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशा उद्विग्न भावना कुंभारी (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdull Sattar) यांच्यासमोर मांडल्या. (Angry farmers deemands faster decision from adminstration)

Abdul Sattar with affected Farmers.
Abdul Sattar News: अब्दुल सत्तार यांच्यापुढे तरुण म्हणाले, `पन्नास खोके, एकदम ओके`

कुंभारी, पंचकेश्‍वर शिवारात तीन दिवसांपूर्वी गारपीट झाली. त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी कृषिमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन देण्यात असमर्थतता व्यक्त केल्याने शेतकरी नाराज झाले.

कृषिमंत्री सायंकाळी चारला येणार म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने त्यांची प्रतीक्षा करीत होते. मात्र, प्रत्यक्षात ते तब्बल तीन तास उशिरा म्हणजे सायंकाळी सातला कुंभारीत पोहचले. त्यानंतर त्यांनी अत्यंत धावत्या पद्धतीने नुकसानीची पाहणी केली अन्‌ एकाच जागेवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

Abdul Sattar with affected Farmers.
Sanjay Raut; शिंदे गटाला हादरा, मंत्री दादा भुसेंवर 157 कोटींच्या लुटीचा आरोप?

शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. अस्मानी, सुलतानी संकटं आपल्या हातात नसतात. पण, नुकसान भरपाई देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करू, अशी ग्वाही श्री. सत्तार यांनी या वेळी दिली. परंतु, काही शेतकरी अक्षरशः संतप्त झाले होते.

आपण नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्‍वासन देता मात्र भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आम्हाला गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Abdul Sattar with affected Farmers.
Uddhav Thackeray News: शिवसेनेने दादा भुसे यांची मतदारसंघातच केली नाकेबंदी!

द्राक्षांसोबतच कांदा, गहू, मका व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असताना मंत्र्यांनी केवळ द्राक्षबागेचीच पाहणी केली. आधीच मोठे नुकसान झाले असताना मंत्रीमहोदय अंधारात दौरा करतात. याचा अर्थ मंत्र्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com