Sanjay Raut; शिंदे गटाला हादरा, मंत्री दादा भुसेंवर 157 कोटींच्या लुटीचा आरोप?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्या विरोधात ट्वीट करून दाखवले हिमनगाचे टोक
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शिवसेना नेते, (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते राहुल कुल (Rahul kool) यांच्या नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर 157 कोटींच्या लुटीच्या आरोपाचा बाँम्ब टाकला आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे सुचक विधान त्यांनी केले त्यामुळे दादा भुसे शिवसेनेच्या टार्गेटवर आले आहेत. (Now Port minister Dada Bhuse came on Sanjay Raut`s Target)

Dada Bhuse
Uddhav Thackeray News: शिवसेनेने दादा भुसे यांची मतदारसंघातच केली नाकेबंदी!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मालेगाव दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात लवकरच त्यांचे प्रकरण बाहेर काढू असे सुचीत केले होते. त्यामुळे याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

याबाबत खासदार राऊत यांनी ट्वीट केले आहे. ते असे, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.

Dada Bhuse
Shivsena News; खेडच्या सभेत प्रतिमाणसी हजार रुपये अन् बिर्याणी

यापूर्वी संजय राऊत भाजप नेते राहुल कुल यांच्या सहकारी संस्थेच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली होती. त्यात त्यांनी सहकारी संस्था बुडवली. त्यात कोट्यावधींचा घोटाळा केल्याचाल आरोप करीत त्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे पाठविली होती. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्याची दौंड तालुक्यात देखील चर्चा झाली. याबाबत अनेक तक्रारदार पुढे आले होते. श्री. कुल यांनी मात्र घोटाळ्याचा इन्कार केला होता.

Dada Bhuse
Dindori Loksabha; राज्यमंत्री भारती पवार यांना `कसबा` पॅटर्नचे आव्हान?

येत्या रविवारी (ता.26) शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची दादा भुसे यांच्या मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अतिशय सक्रीय झाले आहेत. या सभेचे उद्दीष्ट मंत्री भुसे यांना अडचणीत कसे येतील अशी व्युहरचना केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या ट्वीटर बाँम्बने खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com