Uddhav Thackeray News: शिवसेनेने दादा भुसे यांची मतदारसंघातच केली नाकेबंदी!

उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेसाठी स्थानिक नेत्यांना पुर्ण ताकद दिली.
Vinayak Raut with Shivsena leaders
Vinayak Raut with Shivsena leadersSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News: बंदरे विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) कोणाचे? असा संभ्रम सातत्याने मालेगावच्या कार्यकर्त्यांत होता. आता हा संभ्रम उद्धव ठाकरे शिवसेनेने (Shivsena) पुर्ण ताकदीनिशी आयोजित केलेल्या सभेद्वारे दुर होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांना वरिष्ठांनी दिलेल्या ताकदीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने निर्धास्त असलेल्या दादा भुसे यांची त्यांच्याच मतदारसंघात नाकेबंदी केली आहे. (Shivsena leaders given free hand and support to local leaders against Dada Bhuse)

उद्धव ठाकरे यांच्या येथील सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या श्री. राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे, सहसंपर्क जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, गजेंद्र चव्हाण, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी आदी उपस्थित होते.

Vinayak Raut with Shivsena leaders
Ravikant Tupkar : तुपकर गरजले, म्हणाले ‘त्या’ राजकीय गढ्या उद्ध्वस्त करू...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथील सभा यापूर्वी झालेल्या खेड, बुलढाणा या सभेंचा विक्रम मोडणारी ठरेल असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.

श्री. राऊत म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष बागायतदार व कांदा उत्पादक उद्‌ध्वस्त झाला. टरबूज, बटाटा, गहू, हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने अवकाळीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता चोवीस तासाच्या आत थेट मदत करावी.

Vinayak Raut with Shivsena leaders
Sanjay Raut : राहुल कुल यांच्यानंतर आता दादा भुसे राऊतांच्या निशाण्यावर ; म्हणाले 'लवकरच स्फोट...'

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका, अवकाळीने उद्‌ध्वस्त झालेल्या तुमच्या संपूर्ण पिकाची शंभर टक्के नुकसान भरपाई करून द्यायला आमचे सरकार कटिबद्ध आहे अशी घोषणा केली होती. ती घोषणा ते विसरल्याचे श्री. राऊत म्हणाले.

विमा कंपन्यांना चाप लावण्यासाठी शासकीय विमा कंपन्यांची आवश्‍यकता आहे. प्रसंगी शिवगर्जना मोहिमेत येथे होणारी सभा गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढेल. या मोहिमेपाठोपाठ २ एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या सभा होतील. पहिली सभा संभाजीनगरला होईल.

Vinayak Raut with Shivsena leaders
BJP-Thackeray Politics: फडणवीस-जयसिंघानी प्रकरण तापलं; ठाकरे गटाचा फडणवीसांना थेट इशारा

मुख्यमंत्र्यांवर टीका

सध्याचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री आहे. केंद्र शासनाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्या पलीकडे त्यांना दुसरे काम नाही. मिंद्ये सरकारच्या कार्यकाळात उद्योग व कार्यालये परराज्यात जात आहेत. आता तर वस्त्रोद्योग कार्यालय देखील हलविण्यात येत आहे. त्यामुळे गद्दारांनी व भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी खरमरीत टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com