Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!

Political News : मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे, विजय करंजकर यांचं विविध नेते उपस्थित होते.
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
Sarkarnama
Published on
Updated on

Vilas Shinde News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या समवेत पक्षांतराची चर्चा असलेल्या विलास शिंदे यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आपल्यासोबत सहा माजी नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हा राजकीय धक्का मानला जात आहे.

उपनेते सुधाकर बडगुजर यांनी विलास शिंदे आपल्या सोबत भारतीय जनता पक्षात (Bjp) प्रवेश करतील असा दावा केला होता. मात्र दोन आठवडे विविध चर्चांना प्रोत्साहन देत शहर प्रमुख विलास शिंदे यांनी रविवारी अखेर शिवसेना पक्षात प्रवेश केला. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत ते संभाव्य उमेदवार आहेत.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
Raj-uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; मनसे-उद्धव ठाकरे सेनेच्या ‘या’ दोन बड्या नेत्यांची भेट, बंद दराआड नेमकी काय झाली चर्चा?

माजी नगरसेवक आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी शेकडे समर्थकांसह प्रवेश करीत असल्याचा दावा केला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे, विजय करंजकर यांचं विविध नेते उपस्थित होते.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
Uddhav Thackeray protest : उद्धव ठाकरे उतरले रस्त्यावर; जीआरची होळी करत म्हणाले, 'सक्ती आम्ही...'

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांचे स्वागत केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांची योग्य प्रतिष्ठा राखली जात नाही. आम्ही विलास शिंदे यांचा योग्य सन्मान करू. त्यांना या पक्षात काम करण्यासाठी भरपूर संधी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
BJP Vs NCP : निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी! भाजप-राष्ट्रवादी आमने सामने; मुश्रीफांच्या दाव्याने महायुतीत मिठाचा खडा?

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि हिंदुत्वावर काम करणारा खरा पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे फक्त नावालाच अस्तित्वात आहेत. लवकरच मातोश्री वरचा हा पक्ष महाराष्ट्रात शोधावा लागेल अशी सध्याची स्थिती आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
Devendra Fadnavis : भास्कर जाधवांची सही नाही, 5-3-2 चा खेळ अन् 24 चुका; फडणवीसांनी अधिवेशनाआधीच केली विरोधकांंच्या पत्राची चिरफाड

यावेळी विलास शिंदे यांनी आपण 30 वर्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात काम केले. मात्र आपल्या कामाची कधीही योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे माझ्यावर सतत अन्याय झाला. प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
BJP News : फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजप हायकमांड सोपवणार मोठी जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कार्यकर्त्यांना सन्मान देण्याची भावना आहे. कोणतेही काम करण्यासाठी एकनाथ शिंदे हेच खरे नेते आहे. त्यांच्या कामाचा अनुभव आम्ही घेतला आहे. त्यामुळेच शिवसेना शिंदे पक्षात जात असल्याने खऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जात असल्याच्या भावना माझ्या मनात आहेत असे विलास शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
BJP new state president : पक्षनेतृत्वानं दाखवला मोठा भरवसा; मित्रपक्षाला भिडणाऱ्या भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना आता गियर बदलावा लागणार

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नाशिक शहरात हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. यापूर्वी उपनेते सुधाकर बडगुजर यांनीही भाजप पक्षात प्रवेश केला होता. या दोन्ही नेत्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पक्ष विरोधी कारवाई केल्याने बडतर्फ केले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने ठाकरे पक्षाला त्यातून सावरण्यास अवधी लागेल.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; भाजपला हुलकावणी देत शिंदे अखेर शिंदेंकडेच!
BJP Vs NCP : निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी! भाजप-राष्ट्रवादी आमने सामने; मुश्रीफांच्या दाव्याने महायुतीत मिठाचा खडा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com