Dhule BJP News : काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर!

Kunal Patil of Congress has been offered an open offer to join BJP-भाजपच्या महापौर म्हणतात, आमच्या पक्षात गर्दी असली तरीही तुम्हाला जागा देऊ!
MLA Kunal Patil
MLA Kunal PatilSarkarnama

Kunal Patil News : शहराच्या महापौर चौधरी यांनी काल शिक्षकांच्या एका कार्यक्रमात आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. बसमध्ये गर्दी असली तरी आपली जागा सांभाळण्यासाठी धडपड करावीच लागते. त्यामुळे आमदार पाटील यांनी भाजपमध्ये यावे, गर्दी असली तरीही आम्ही त्यांना जागा करून देऊ. महापौर चौधरींच्या चपखल उदाहरणाने उपस्थितांत खसखस पिकली. (BJP mayor says to MLA Kunal Patil to join BJP in Dhule)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांत हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच भाजपने (BJP) काँग्रेसचे (Congress) धुळ्यातील (Dhule) प्रमुख नेते व भाजपचे प्रतिस्पर्धी असलेल्या कुणाल पाटील (Kunal Patil) यांना ही ऑफर दिल्याचे बोलले जाते.

MLA Kunal Patil
Eknath Shinde: किशोर पाटलांच्या आग्रहावरून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ जाणार पाचोऱ्यात!

धुळ्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचऱ्यांच्या पतसंस्थेच्या निवृत्त सभासदांच्या पाल्यांच्या सत्काराचा तसेच कर्तव्यपूर्ती कार्यक्रम झाला. यावेळी आमदार कुणाल पाटील, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, महापौर प्रतिभाताई चौधरी, संस्थाचालक हबीब अन्सारी आदी नेते व्यासपीठावर होते.

यावेळी आमदार कुणाल पाटील व महापौर प्रतिभाताई पाटील यांच्यातील जुगलबंदी रंगली. शिक्षकांचा सत्कार सुरू असताना मंचावर महापौर चौधरी यांनी बाजूलाच बसलेल्या आमदार पाटील यांना भाजपत प्रवेशाचे आमंत्रण दिले.

MLA Kunal Patil
Nashik Politics : ‘भाजप’च्या पराभवाची सुरवात ‘इंडिया’ महाराष्ट्रापासून करेल!

त्यावर आमदार पाटील अहिराणी बोलीत म्हणाले, की ‘तुमना पक्षामा भलतीच गर्दी से. आमना म्हातून ज्या पाहिले तुमनामा जायेल सेत तेसलेच न्याय भेटना नही. मी येईसनी काय करसू’ असे सांगताच एकच हशा पिकला. आमदार पाटील म्हणाले, की आमदार सत्यजित तांबे अपक्ष असल्याने आम्ही त्यांना आमचा व तुम्ही त्यांना तुमचा समजतात. असेच चालू द्या पुढच्या निवडणुकीपर्यंत. आमदार पाटील यांच्या या बोलण्याला आमदार तांबे यांनीही हसून दाद दिली.

सत्यजित तांबे यांनी शिक्षकांचे प्रश्न व जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाला भाग पाडू, असे आश्वासन दिले.

MLA Kunal Patil
Mahayuti Meeting at Varsha : 'इंडिया' आघाडीची बैठक होत असताना 'वर्षा'वरही महायुतीची खलबतं...; काय आहे प्रकरण?

पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. के. चौधरी, संचालक संजीव मासरे, मनोहर चौधरी, जितेंद्र पारधी, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, बापू राठोड, गोकुळ पाटील, देवीदास पाटील, शरदचंद्र देवरे, गंजीधर पाटील, अशोक अहिरे, संगीता चौधरी, हेमलता पाटील, संजय पाटील, राजीव पाटील यांनी संयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com