Nashik Politics : ‘भाजप’च्या पराभवाची सुरवात ‘इंडिया’ महाराष्ट्रापासून करेल!

Shivsena, NCP leaders jubilation in front of congress Bhavan in Nashik-नाशिक शहरातील शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला काँग्रेस भवनसमोर जल्लोष
INDIA leaders celebration in Nashik
INDIA leaders celebration in NashikSarkarnama

Prashant ‘INDIA’ News : ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील मोदी विरोधक नेते मुंबईत एकत्र आले. या पार्श्वभूमीवर भाजप विरोधकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्याची प्रचिती काल शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दाखवली. त्यामुळे गोधळलेल्या भाजप व समर्थकांची चलबिचल झाल्याचे चित्र आहे. (INDIA front leaders celebrate on the eve on Mumbai meeting)

नाशिक (Nashik) शहरात काँग्रेससह (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena) तसेच त्यांच्या सहकारी पक्षांनी काल मुंबईतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर जल्लोष केला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) पराभवाचा निश्चय व्यक्त करण्यात आला.

INDIA leaders celebration in Nashik
Rahul Gandhi In India Meeting : राहुल गांधी गेले कुठे ? कुणालाच माहिती नाही; हॉटेलमधून ताफा बाहेर..

देशभरात लोकसभा निवडणुकीचा मूड तयार होत आहे. विविध राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप विरोधी पक्षाच्या नेते काल मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी एकत्र आले होते. ही राज्याच्या दृष्टीने चर्चेतील बातमी होती.

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभव करू असा निश्चय व्यक्त केला. भाजपच्या तानाशाही सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यात इंडिया आघाडी यशस्वी होईल. देशांमध्ये परिवर्तन होईल असे मत या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांनी व्यक्त केले.

INDIA leaders celebration in Nashik
Prashant Dikker News : शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा टोकाचं पाऊल उचलणार ; बेपत्ता प्रशांत डिक्करांचा व्हिडिओ व्हायरल..

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने नाशिक शहर काँग्रेस भवन येथे आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. काँग्रेस भवन येथे ढोल ताशाच्या गजरात, पेढे वाटप करून सर्वपक्षीय जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट, डाव्या आघाडीच्या पक्षांच्या विविध झेंड्यांनी याप्रसंगी केला.

INDIA leaders celebration in Nashik
Mahayuti Meeting at Varsha : 'इंडिया' आघाडीची बैठक होत असताना 'वर्षा'वरही महायुतीची खलबतं...; काय आहे प्रकरण?

यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गजानन शेलार, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे, शिवसेना गटनेचे विलास शिंदे, नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका अशा तडवी, देवानंद बिरारी, गोकुळ पिंगळे, महेंद्र बडवे, ऋषी वर्मा, हनीफ बशीर, अल्तमश शेख, स्वाती जाधव, सुनील मालुसरे, राजू देसले, भालचंद्र पाटील, संतोष ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com