Mahayuti Meeting at Varsha : 'इंडिया' आघाडीची बैठक होत असताना 'वर्षा'वरही महायुतीची खलबतं...; काय आहे प्रकरण?

Shinde-Fadanvis-Pawar Politics : बैठकीत तीन ठराव पारित करण्यात आले
Mahayuti Meeting at Varsha
Mahayuti Meeting at Varsha Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होत असतानाच दुसरीकडे राज्यातील महायुतीच्या घटक पक्षांचीही गुरुवारी रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावर ही बैठक पार पडली. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे, असा ठराव संमत करण्यात आला.

यासोबत आणखी तीन ठरावही पारित करण्यात आले. यात पहिला म्हणजे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्त्रो'च्या सर्व शास्त्रज्ञांचे चांद्रयान मोहिमेबद्दल अभिनंदन करण्यात आले. दुसरे म्हणजे, आगामी काळात होणाऱ्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. विशेष म्हणजे महायुतीतील ऐक्य टिकवून विजय संपादन करण्यासाठी सर्वच घटक पक्षांपुढे संघटितपणे काम करण्याचेही आव्हान आहे. तिसरा जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्याबद्दल यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या विकासात मोठी घसरण झाली. ही थांबवून थांबवून महायुती सरकारने आता सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक, सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची वाढ होत आहे. याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.

Mahayuti Meeting at Varsha
One Nation One Election : सर्वात मोठी बातमी; वन नेशन-वन इलेक्शनसाठी समिती स्थापन; डिसेंबरपर्यंत निवडणुका लागणार ?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते स्वतःला संकल्पबद्ध करीत आहेत, असेही या ठरावात सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा संकल्पही यावेळी करण्यात आला. तसेच, यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, जोगेंद्र कवाडे यांनीदेखील आपापल्या भूमिका मांडल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com