Grampanchayat News; उमेदवारीसाठी सकाळी राष्ट्रवादी सायंकाळी शिवसेना!

गावगाड्याच्या निवडणुकीने कार्यकर्ते, नेत्यांत राजकीय कुरघोड्यांची स्पर्धा
Leaders cartoon
Leaders cartoonSarkarnama
Published on
Updated on

चांदोरी : (Nashik) सुरवाती पासून शिवसेनेच्या (Shivsena) गटाकडून सरपंचपदाचे उमेदवार असलेल्या विनायक खरात (Vinayak Kharat) यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला. सरपंचपदाचा शब्द न मिळाल्याने पुन्हा स्वगृही परतत शिवसेनेकडून उमेदवारी कायम ठेवली. गेल्या अनेक वर्षांची ग्रामपालिकेवर अनेक वर्षांची सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या गटाकडून संजय गायखे रिंगणात आहे. (Candidate joine NCP in the morning and return home in Shivsena in the evening)

Leaders cartoon
Sureshdada Jain news; जैन आज जळगावात, भाजप नेते झाले सावध

गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीने निफाड तालुक्यातील गावपातळीवरील राजकारण चांगलेच तापले आहे. गाव नेत्यांनी आपल्या गटात आपले ऐकणारे उमेदवार उभे करून अनेकांना शेवटपर्यंत शब्द देवून झुलवत ठेवल्याचे चित्र देखील दिसत आहे. आपल्या मर्जीतील ताफा गावपातळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच होण्यासाठी सज्ज करून मतदारांची राजीखुशी राखत विजयाची बाजी मारण्यासाठी राजकीय रणांगणात डावपेच आखले जात आहे. निवडणुकीमुळे गाव पातळीवर राजकीय गणिते करण्यात स्थानिक नेते व्यस्त असून कुरघोड्या वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Leaders cartoon
Police transfer; अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलिस आयुक्त, सुनील फुलारी नवे आयजी

निवडणूक म्हटले की, राजकारण आलेच. एरवी एकमेकांशी गुण्या गोविंदाने नांदणारे ग्रामस्थ गावच्या निवडणुकीत एकमेकांचे पॅनल बदलले असल्याने बघूनही काणाडोळा करताना दिसून येत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराची कमजोरी आणि राजकीय आडाखे ओळखून शह कट करण्यात परस्पर विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते सध्या गावपातळीवर काम करत आहे. निफाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये दिसणारे हे चित्र राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चांदोरी, नागापूर ग्रामपालिका निवडणुकीत दिसत असून या ठिकाणी दोन पॅनल निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहे.

सरपंचपदासाठी अपक्ष ही रिंगणात

सुरवाती पासून शिवसेनेच्या गटाकडून सरपंचपदाचे उमेदवार असलेल्या विनायक खरात यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. सरपंचपदाचा शब्द न मिळाल्याने पुन्हा स्वगृही परतत शिवसेनेकडून उमेदवारी कायम ठेवली. गेल्या अनेक वर्षांची ग्रामपालिकेवर अनेक वर्षांची सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या गटाकडून संजय गायखे रिंगणात आहे.

स्वराज्य संघटनेच्यावतीने शिवाजी मोरे उमेदवारी करत असून अपक्ष म्हणून विनायक नाठे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

नमस्कार-चमत्काराने मनधरणी

सध्या ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराडा पेटल्यामुळे प्रत्येक गावात माणुसकीला उधाण आलेले आले आहे. नमस्कार-चमत्कार करून मतदारांची मनधरणी केली जात आहे. अडचणीला हातभारही लावला जात आहे. परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धंदे जोमात सुरू असून,हॉटेलवर गर्दी होत आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवसात माणुसकीला उधाण आलेले असल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com