Sureshdada Jain news; जैन आज जळगावात, भाजप नेते झाले सावध

जैन समर्थक, कार्यकर्ते, चाहत्यांतर्फे होणार ढोलताशांच्या गजरात उत्साही स्वागत
Sureshdada Jain
Sureshdada JainSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : राज्याचे माजी मंत्री शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाचे नेते सुरेशदादा जैन (Sureshdada Jain) तब्बल पाच वर्षांनंतर आज जळगावात (Jalgaon) येत आहेत. चाहत्यांतर्फे त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. सुरेशदादा जैन यांचा मोठा प्रभाव या शहराच्या राजकारणावर राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेत उत्साह तर भाजप (BJP) नेते सावध झाले आहेत. (BJP leaders are alert since Shivsena leader Suresh jain will be in Jalgaon)

Sureshdada Jain
Suhas Kande News: तुमच्यासाठी जेलमध्ये जायला देखील तयार आहे!

सुरेशदादा जैन यांचा शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव राहिली आहे. जैन आणि जळगाव हे एक समिकरण असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण आहे. सध्या जळगावच्या राजकारणावर पकड असलेल्या भाजपसाठी राजकीयदृष्ट्या हा विषय सावध होण्याचा आहे. त्यामुळे भाजपचे नेते जैन यांचे स्वागत कसे होते यावर लक्ष ठेऊन आहेत.

Sureshdada Jain
Dada Bhuse News: पालकमंत्र्यांच्या प्रस्तावाला महापालिकेने दाखवला ठेंगा

माजी मंत्री सुरेशदादा जैन घरकुल प्रकरणानंतर तब्बल पाच वर्षांपासून मुंबई येथे होते. त्यांना न्यायालयाने मुंबई बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र, नुकताच न्यायालयाने कायम जामीन मंजूर केला. त्यांना राज्यात कोठेही जाण्यास मंजुरी दिली. त्यानंतर बुधवारी ते प्रथमच जळगावला येत आहेत. राजधानी एक्सप्रेसने रात्री पावणेनऊला जळगाव रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होणार आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यांनी स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. याबाबत विराज कावडिया यांनी सांगितले, की रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरेशदादा जैन जळगावात येणार आहेत.

रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी लाल मॅट टाकण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात येईल. त्यानंतर रेल्वेस्थानकाबाहेर सनई चौघडे वाजविण्यात येतील, तसेच पंजाबी भांगडा पथक असेल. खानदेश सेंट्रलमार्गे ते गोविंदा चौकात येतील. त्या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक पुढे जाईल. शहरातील चौकाचौकांत त्यांचे स्वागत करण्यात येईल. शिवसेना ठाकरे गटातर्फेही स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक लागली आहेत. शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले, की ढोलताशांच्या गजरात रेल्वेस्थानकापासून ते शिवाजीनगरातील त्यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com