APMC election politics : एकनाथ शिंदे गटाला भाजपपेक्षा देविदास पिंगळे लाभदायक?

नाशिकच्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुरू आहेत लोकसभा निवडणुकीचे डावपेच.
Hemant Godse & devidas Pingle
Hemant Godse & devidas PingleSarkarnama
Published on
Updated on

Nashik APMC election news : नाशिक बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे निवडणुक जरी बाजार समितीची असली तरी त्यात लोकसभा निवडणुकीचे डावपेच टाकले जात आहेत. त्यात एकनाथ शिंदे गटाला भाजपच्या नेत्यांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपयुक्त आणि निरूपद्रवी वाटत असल्याने त्यांनी चक्क भाजपचा मैत्रीचा हात झिडकारला आहे. (Eknath Shinde group may be keep away from Nashik APMC election)

नाशिक (Nashik) बाजार समिती राज्यातील आघाडीची समिती आहे. त्यात गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांची सत्ता राहिली आहे. ही सत्ता उखडण्यासाठी भाजपने (BJP) राज्यातील सत्तेचा वापर करूनही त्यांना ते शक्य झाले नव्हते. या निवडणुकीत (Election) मात्र भाजपचा सहकारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट देविदास पिंगळे यांना अनुकूल भूमिका घेताना दिसत आहे.

Hemant Godse & devidas Pingle
Dr. Rahul Aher news : आमदाराची कमाल एकाच अधिवेशनात मिळवले ८०० कोटी!

बाजार समितीच्या राजकारणात भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे हे पिंगळे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यात एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रारंभी रस घेतला होता. त्यामुळे या तिन्ही नेत्यांचा एकत्रीत पॅनेल होईल अशी शक्यता दिसत होती.

प्रत्यक्षात मात्र खासदार गोडसे यांना बाजार समितीहून आगामी लोकसभा निवडणूक महत्वाची वाटते. माजी खासदार पिंगळे यांनी बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या दोन्ही विरोधकांची राजकीय गरज भिन्न मात्र एकमेकांना अनुकूल आहे. त्यात त्यांनी अलिखीत समझोता केल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने भाजप नेत्यांचा मैत्रीचा हात आणि पॅनेल करण्याचा प्रस्ताव गैरसोयीचा वाटला. त्यांनी तो झिडकारल्याचे कळते.

Hemant Godse & devidas Pingle
Chhagan Bhujbal news : भुजबळ यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले कडवे आव्हान!

महत्वाचे कारण म्हणजे भाजप नेते दिनकर पाटील लोकसभा निवडणुकीतील प्रमुख इच्छुक उमेदवार आहे. त्यामुळे निवडणूक बाजार समितीची मात्र प्रत्येकाचे डावपेच लोकसभा निवडणुकीचे आहेत. त्यात एकनाथ शिंदे गटाने एकाच बाणात भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवाराची कोंडी आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना `ऑल क्लीअर`चा सिग्नल देत चातुर्य दाखवले आहे.

नाशिक बाजार समिती निवडणुकीत आजी-माजी खासदार नव्हे तर महाविकास आघाडी व भाजप शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार होती. त्यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे यांची निवडणूक संदर्भात बैठक झाली.

Hemant Godse & devidas Pingle
Rahul Gandhi Matoshri Visit: सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी मातोश्रीवर येणार,ठाकरेंच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

ठाकरे गटाकडून काही जागांची मागणी करण्यात आली. त्यात काही जागांवर एकमत झाले, काही जागांवर मात्र चर्चा सुरू आहे. पूर्ण पॅनल कशा निवडून येईल, कोणत्या जागेवर कोणता उमेदवार द्यायचा याविषयी विचार विनिमय करण्यात आला. उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com