Bawankule On Amit Thackeray: अमित ठाकरेंनी टोल नाक्यावर आंदोलन करायला हवं होतं; बावनकुळेंनी 'मनसे'ला पुन्हा डिवचलं

Chandrashekhar bawankule: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मनसेवर टीका
Chandrashekhar bawankule On Amit Thackeray
Chandrashekhar bawankule On Amit ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड केली होती. यानंतर त्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटकही करण्यात आली. मात्र, या प्रकरणावरून भाजपकडून अमित ठाकरेंचा खरपूस समाचार घेण्यात आला.

आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अमित यांना खोचक सल्ला देत "अमित ठाकरेंनी टोल नाक्यावर आंदोलन करायला हवं होतं", असं म्हणत पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर मनसे आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे.

Chandrashekhar bawankule On Amit Thackeray
Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरेंच्या भोवतीचं १५ आमदारांचं 'कडं' अधिवेशनात का दिसेना कुठे..?

मंगळवारी भाजपने ट्विट करत "टोलनाके फोडण्याआधी बांधायला शिका आणि शिकवा", असा सल्ला दिला. तर यावरूनच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी थेट मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य करत "भाजपने मनसेला शिकवू नये", अशा शब्दात सुनावले. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटलांनीही 'भाजपचं काय दुखतंय, अमित ठाकरेंचं बोलणं खुपतंय', असं म्हणत भाजपवर घणाघात केला.

Chandrashekhar bawankule On Amit Thackeray
Monsoon Session News : `बार्टी`च्या विषयावर गदारोळ, प्रश्न राखून ठेवण्याची विरोधकांची मागणी..

सिन्नर येथील टोलनाक्याच्या तोडफोडीच्या प्रकरणानंतर भाजप आणि मनसेतील वाद चांगलाच टोकाला गेला आहे. आता यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा यावरून मनसेला खोचक सल्ला देत "अमित ठाकरेंनी टोल नाक्यावर आंदोलन करायला हवं होतं", असं म्हणत मनसेला डिवचलं आहे. यावर आता पुन्हा मनसेकडून काही प्रतिक्रिया येत का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com