Sandeep Joshi-Vijay Wadettiwar
Sandeep Joshi-Vijay WadettiwarSarkarnama

Sandeep Joshi - वडेट्टीवारांच्या 'त्या' वक्तव्यावर आमदार जोशींचा पलटवार; म्हणाले 'आधी काँग्रेसचा इतिहास पाहा'

Sandeep Joshi Vs Vijay Wadettiwar- अबू आझमी कोणाच्या दबावातून वक्तव्य करतात हे सर्वज्ञात आहे, मात्र काँग्रेस अशा वक्तव्यांना राजकीय हेतूने वापरत आहे. असंही आमदार संदीप जोशी म्हणाले आहेत.
Published on

Sandeep Joshi responds to Vijay Wadettiwar's criticism over Abu Azmi - समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारकरी संप्रदाय आणि नमाज पठण याविषयी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाला काँग्रेसने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजपचे नागपूरचे आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या 'अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' या आरोपावर प्रत्युत्तर देताना जोशी यांनी, काँग्रेस आणि मुस्लिम लीग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा पलटवार केला आहे.

वडेट्टीवारांनी भाजपवर टीका करताना म्हटले होते की, अबू आझमी हे एक पिल्लू सोडतात आणि भाजप हिंदू-मुस्लिम भांडण लावतात. या विधानाला उत्तर देताना जोशी म्हणाले, वडेट्टीवारांनी आधी काँग्रेसचा इतिहास पाहावा. १९७४मध्ये देशाची फाळणी घडवून आणणाऱ्या मुस्लिम लीगसोबत काँग्रेसचे राजकीय मतभेद आजही दिसत नाहीत. उलट तुष्टीकरणाचे धोरण आजही काँग्रेस चालवत आहे.

२००६ साली मुंबईत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून त्यांनी त्या कार्यक्रमात मुस्लिम लीगचे नेते काँग्रेसच्या व्यासपीठावर होते आणि राष्ट्रगीताला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला होता. हीच ती मानसिकता आहे, जी आजही काँग्रेसमध्ये खोलवर रुतलेली आहे, अशा शब्दात आमदार जोशी यांनी वडेट्टीवार यांचा समाचार घेतला.

Sandeep Joshi-Vijay Wadettiwar
Devendra Fadnavis - मतांचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांनी 'असा' दाखवला 'हा सूर्य..हा जयद्रथ...'

जोशी यांनी स्पष्ट केले की, अबू आझमी कोणाच्या दबावातून वक्तव्य करतात हे सर्वज्ञात आहे. मात्र काँग्रेस अशा वक्तव्यांना राजकीय हेतूने वापरत आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, हे काँग्रेसचे जुनेच धोरण असल्याचा आरोपही जोशी यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे यापूर्वी नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटळ्यावरून संदीप जोशी आणि विजय वडेट्टीवार यांच्यात जुंपली होती. दोघांनी एकेमेकांवर वैयक्तिक आरोप करताना एकमेकांचे संस्कार काढले होते. हा विषय आता दोघांनी बंद केला आहे. आता अबु आझमी यांच्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये नव्याने जुंपणार असल्याचे दिसून येते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com