Nashik Loksabha : नाशिकसाठी शिंदे गटाकडून अजय बोरस्तेंना पसंती? उमेदवारीसाठी चुरस

Loksabha Election 2024 : नाशिक मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीचा दावा केला होता. त्यावर महायुतीतील अन्य पक्षांनी आक्षेप घेतल्याने राजकीय वाद सुरू झाला आहे.
Ajay Boraste Hemant Godse
Ajay Boraste Hemant Godsesarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : नाशिक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटात जोरदार हालचाली सुरू आहेत. पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (रविवारी) विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे उमेदवारी बाबत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

नाशिक मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीचा दावा केला होता. त्यावर महायुतीतील अन्य पक्षांनी आक्षेप घेतल्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. खासदार गोडसे यांना भारतीय जनता पक्षाचा मोठा विरोध आहे.

Ajay Boraste Hemant Godse
Nashik Loksaha : मुख्यमंत्री शिंदे, हेमंत गोडसेंचा एकाच कारने प्रवास; नाशिकचा तिढा सुटला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार गटांनीही खासदार गोडसे यांच्यावर आक्षेप घेतले आहेत. अशा परिस्थितीत महायुतीच्या अंतर्गत राजकारणात गोडसे यांना उमेदवारीसाठी जंग जंग पछाडावे लागले. या पार्श्वभूमीवर आज हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची (Eknath Shinde) भेट घेऊन चर्चा केली. काल (शनिवारी) त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी उमेदवारी बाबत पाठपुरावा केला होता. अशा स्थितीत महायुतीमध्ये नाशिक मतदारसंघासाठी शिंदे गटात जोरदार हालचाली सुरू आहेत.

महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या इच्छुकांमध्ये एकमत होऊ शकेल, असा उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्याबाबत फारसे वाद नाहीत. उमेदवार म्हणून नवा चेहरा असल्याने आणि कोणताही वाद नसल्याने उमेदवारी जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात मतदारांना अपील होईल असा उमेदवार म्हणून बोरस्ते यांचे नाव घेतले जात आहे. पक्षाच्या विविध नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे. शिंदे गटाकडून गोडसे की बोरस्ते यात कोणाला प्राधान्य दिले जाते, याची उत्सुकता आहे.

महायुतीने उमेदवार जाहीर करण्यास विलंब केल्याने स्थानिक नेत्यांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार यापूर्वीच सुरू झाला आहे. अशा स्थितीत वाजे यांच्याशी स्पर्धा करू शकेल आणि विरोधकांना फारसे आक्षेप घेता येणार नाहीत अशा उमेदवाराला शिंदे गटाकडून प्राधान्य देण्याचा विचार आहे. महायुतीच्या अन्य सहकारी पक्षांना ही जागा सोडण्यास शिंदे गटाने नकार दिला आहे.

त्यामुळे शिंदे गटाकडून सध्या केवळ खासदार गोडसे आणि गेल्या दोन माजी उपमहापौर अजय बोरस्ते हे दोनच इच्छुक आहेत. दोन दिवसात ही नावे वेगाने पुढे आली आहेत. त्यामुळेच खासदार गोडसे हे देखील सक्रिय झाल्याचे दिसून येते. लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिंदे गट कधी नव्हे तो सक्रिय झाला आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रोजच मुंबईच्या वाऱ्या करीत आहेत.

अजित पवार गटाची माघार?

नाशिक लोकसभा मतदारसंघावरील शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाने आपल्या दावा अधिक भक्कम केला आहे. गेले काही दिवस या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. त्यात भारतीय जनता पक्षाने हस्तक्षेप केल्याने शिंदे गट दबावात होता. आता मात्र राजकीय स्पर्धा थंडावल्यासारखी स्थिती आहे. अजित पवार गटाकडून देखील फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाच्या इच्छुकांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

(Edited By Roshan More)

Ajay Boraste Hemant Godse
Dhananjay Munde News : 'आता 'खान की बाण' विसरा अन् विकासाची 'जान'असणाऱ्याला निवडा' ; धनंजय मुंडेंचं आवाहन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com