Ajit Pawar News : पवार आजोबा-नातवासह लंकेंना अजितदादांच्या झोंबणाऱ्या कानपिचक्या

Ajit Pawar On Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाचा डंका जगात पाहायला मिळाला," असं कौतुक अजित पवारांनी केलं. याच सभेत अजितदादांनी आमदार रोहित पवारांवरही निशाणा साधला.
ajit pawar
ajit pawarsarkarnama

Ahmednagar News, 11 May : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांना कानपिचक्या, तर माजी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांना कर्जतच्या जाहीर सभेत सल्ला दिला. 'वडिलधाऱ्यांनी तरुणांना संधी दिली पाहिजे. मात्र, आमच्याकडे सेवानिवृत्त (रिटायर) होत नाही, ही शोकांतिका आहे', असा चिमटा अजित पवारांनी शरद पवाराचे नाव न घेतला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ( Ahmednagar Lok Sabha Election 2024 ) महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्यासाठी कर्जतमध्ये सभा झाली. या सभेत अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याबरोबर आमदार रोहित पवार आणि माजी आमदार नीलेश लंकेंना लक्ष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या काळात देशाचा डंका जगात पाहायला मिळाला. सध्या बेरजेच्या राजकारणात सगळ्यांना सोबत घेत विकासाचे राजकारण व्हावे," अशी भावना देखील अजित पवार यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार राम शिंदे, खासदार सुजय विखे, मंगलदास बांदल, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे उपस्थित होते.

"बोलतो तसे वागतो. म्हणून राजकारणात टिकलो," असे सांगून "वडिलधाऱ्यांनी तरूणांना संधी दिली पाहिजे. मात्र, आमच्याकडे सेवानिवृत्त होतच नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही कामच करतोय. कुठेच कमी नाही. आता आमची वयाची साठी गाठली. संधी मिळायला हवी ना?" असे म्हणत अजितदादांनी शरद पवारांते नाव न घेता त्यांना लक्ष्य केले.

अजितदादांनी आमदार रोहित पवारांवरही निशाणा साधला. "जीव ओतून काम करावे लागते. तेव्हा त्या भागाचे नंदनवन होते. नुसते भाषणबाजी करून जमत नाही. अडीच वर्षात याला कर्जत 'एमआयडीसी' जमली नाही, हे सत्य आहे. पहिल्याच टर्मला याला राज्याचा नेता व्हायचे स्वप्न पडले. आपण कर्जत-जामखेडला निधी दिला. नाहीतर घंटा वाजवत बसावे लागले असते. सभेत नुसते गप्पा मारू नका. पहिल्यापासून सोशल मीडिया चालवायला चांगले जमते. त्यामुळे कोणताही 'जीआर' निघाल्याचे समजले हा पठ्या त्यावर टाकणारच," असे म्हणत अजितदादांनी रोहित पवारांवर टीका केली.

ajit pawar
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचाही अजितदादांनी खरपूस समाचार घेतला. "नीलेश लंकेला सल्ला दिला होता. आणखी पाच-दहा वर्षे राज्यात काम कर. नंतर दिल्लीत जाण्याचे पाहा. पण, त्याला हवा भरली आणि तो देखील उभा राहिला. आता याचा कार्यक्रम होत असतो का नाही, ते बघा," असे अजित पवारांनी म्हटलं.

"...म्हणून घरातील उमेदवार दिला"

"अंबालिका कारखान्यामुळे या मतदारसंघाचा संबंध येतो. निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटावे, ही प्रामाणिक भावना आहे. खेड भागात भीमा नदीवर बॅरेज टाकण्याचा विचार आहे. कुकडीबाबत अभ्यास चालू आहे. तुमच्यासाठी आणखी पाणी कसे उपलब्ध होईल, यावर विचार सुरू आहे. सासुरवाडी आणि सासऱ्याच्या मतावर भागत नाही. निवडून येण्यासाठी सर्वसामान्यांचे मतदान पण लागतील म्हणून समजावून इकडे घरातील उमेदवार दिला," असं अजित पवारांनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

ajit pawar
Ajit Pawar News : मी त्या शाळेचा हेडमास्तर; अजितदादांचा लंकेंना 'दादा' स्टाईल इशारा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com