Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर भाजपमध्ये कुरकुर; काय आहे प्रकार?

Ahmednagar Political News : संगमनेरमध्ये भाजपमध्ये 'नाॅट इज वेल'ची स्थिती दिसतेय.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sangamner
Published on
Updated on

Ahmednagar News : संगमनेर भाजपमध्ये संघटनात्मक कुरकुर सुरू झाली आहे. जुन्या आणि नवीन पदाधिकारी यांच्यातील शीतयुद्ध या कुरकुरीमागे असल्याचे कारण समोर येत आहे. यातून उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचेच हूस झाले आहे. सुरुवातीला कार्यकारिणी रद्दबाबत घेतलेला निर्णय लंघेंना पुढे जाऊन स्थगित करावा लागला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात, संगमनेरमध्ये भाजपमध्ये 'नाॅट इज वेल'ची स्थिती दिसतेय. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Chitra Wagh ON NCP : 'पवारांना या वयातही फिरावे लागते; पुढची फळी कूचकामी...' ; चित्रा वाघांचा निशाणा!

संगमनेरची तालुका कार्यकारिणी तीन महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली. सर्वसमावेशक म्हणून कार्यकारिणीचा गौरव झाला. वरिष्ठ नेत्यांनी शुभेच्छा देत कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, दोन महिन्यांतच या कार्यकारिणीत नव्या-जुन्यांमध्ये कुरकुरी सुरू झाल्या आहेत. हा वाद विकोपाला गेला. यातून कार्यकारिणीच्या कामकाजावर परिणाम झाला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामकाज ठप्प पडले. यातून काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीतील वादाला तोंड फोडले. हा वाद विकोपाला गेल्याने संगमनेरचे भाजप तालुकाध्यक्ष काही दिवस संपर्क क्षेत्राबाहेर गेले. हे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी काढलेल्या पत्रातून समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संगमनेरचे भाजपचे तालुध्यक्ष वैभव लांडगे यांना कार्यकारिणी रद्द करण्याचे पत्र काढताना विठ्ठलराव लंघे यांनी त्यात म्हटले आहे की, चार दिवसांपासून पक्षाच्या कामकाजापासून अलिप्त आहात. आपल्याला दूरध्वनीवर संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही. आपल्याशी शहराध्यक्ष यांनी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मी स्वतः संगमनेर येथे येऊन आपल्या संगमनेर कार्यालयात व आपल्या गावी निवासस्थानी येऊनदेखील आपली भेट झाली नाही. आपल्यासोबत संपर्क झाला नाही. यानंतर दूरध्वनीवर संपर्क झाला. यात आपण पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावर काम न करण्याची भावना व्यक्त केली. या सर्व परिस्थितीचा विचार करून आणि आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर आपल्याला संगमनेर तालुकाध्यक्ष पदासह कार्यकारिणी रद्द करत आहे, असे विठ्ठलराव लंघे यांनी म्हटले आहे.

दरम्यानच्या या काळातील कुरकुरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर गेल्या. वैभव लांडगे हे भाजपचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. माजी पालकमंत्री आमदार प्रा. राम शिंदे आणि प्रदेश सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले. यानंतर प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी संगमनेर कार्यकारिणीतील वादाची दखल घेत उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी कार्यकारिणी रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे भाजपमधील कार्यकर्ते आणि नेत्यांना 'कान भरो' कार्यकर्त्यांना चपराक बसली आहे. याचबरोबर या निर्णयामुळे तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

Lok Sabha Election 2024
SangliCorporation News : "महापालिकेमुळे 31 कोटींचा निधी परत, गैरकारभारामुळे...", भाजप नेत्याचा आरोप

भाजप (BJP) पक्ष संघटन समजून घेण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी अनेक केडर शिबिराचा लाभ घेतला आहे. मात्र, नव्यानेच पक्षात आलेल्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना व्यक्तीनिष्ठ राजकारणांचे धडे शिकवले जातात. यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठ कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढत चालली खरी. परंतु ही पद्धत येणाऱ्या (Lok Sabha) लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा नेत्यांना मान खाली घालायला लावेल, असेच चित्र सध्या नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये निर्माण झाल्याचे दिसते.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com