Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी तीन नावांचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्ष निरीक्षकांसमोर धरला आहे. विद्यमान खासदार डाॅ. सुजय विखे, आमदार प्रा. राम शिंदे आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड यांचा त्यात समावेश आहे. पक्ष निरीक्षक रवींद्र चव्हाण आणि देवयानी फरांदे यांनी प्रदेश भाजपकडे अहवाल सादर केला असून, तो केंद्रीय नेतृत्वाकडे जाणार आहे. परंतु भाजपच्या पहिल्या यादीत नगरच्या उमेदवाराचा समावेश नसणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Lok Sabha Election 2024)
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने नियुक्त केलेले निरीक्षक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार देवयानी फरांदे यांनी गुरूवारी नगरमध्ये येऊन उमेदवारीबाबत प्रमुख निमंत्रित शंभर पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेतली. पदाधिकाऱ्यांशी पक्ष निरीक्षकांनी सर्व चर्चा बंद खोलीत केली. निमंत्रितांच्या यादीत नाव नसताना देखील एका नगरसेवकाला एका नेत्याने फोन करून बोलावून घेतल्याने व विशिष्ट नावाने मत व्यक्त करण्यासाठी निरीक्षकांपुढे जाण्याचा सल्ला दिला. परंतु या पदाधिकाऱ्याला निरीक्षकांच्या खोलीत प्रवेश देण्यात आला नाही. या प्रकाराची चर्चा आता रंगली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रवींद्र चव्हाण आणि देवयांनी फरांदे (Devyani Pharande) यांनी याबाबत माध्यमांशी बोलणे टाळले. या उमेदवारी चाचपणीमध्ये निष्ठावान भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याविरोधात इतर असे काहीसे चित्र होते. हे ध्रुवीकरण भाजपची नगरमध्ये डोकेदुखी वाढवत असल्याची देखील चर्चा होती. नगरमधील प्रक्रियेचा अंदाज घेता पहिल्या यादीत नगरच्या उमेदवाराचा समावेश नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पक्ष निरीक्षक आपला अहवाल प्रदेश भाजपकडे पाठवला जाणार असून, त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणार आहे. ही प्रक्रिया फार्स ठरू नये, असे देखील पक्ष निरीक्षकांच्या खोलीबाहेर चर्चा होती.
नगर दक्षिणसाठी (Ahmednagar) इच्छुक असलेले आमदार प्रा. राम शिंदे हे धुळे येथे पक्ष निरीक्षक म्हणून गेले होते. त्यामुळे ते पक्ष निरीक्षकांसमोर अनुपस्थित होते. खासदार डाॅ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.