Loksabha election 2024: भाजपचे 'हे' धोरण भारती पवारांच्या अडचणी वाढवणार?

Bharti Pawar News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा प्रचार सुरू आहे. कांदा निर्यातबंदी या विषयावर मतदारांकडून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे.
Bharti Pawar
Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

Dr Bharti Pawar politics : नाशिक, दिंडोरीसह विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये कांदा निर्यातबंदीचा प्रश्न भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढवत आहे. केंद्रातील भाजप सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कांदा निर्यातबंदी करून भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढविणार असल्याचे दिसत आहे.

केंद्र शासनाने (Central Govt) डिसेंबरच्या प्रारंभी कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणी केली होती. त्यानंतर 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban) जाहीर करण्यात आली. या वेळी पणन मंत्रालयाने घेतलेला निर्णय 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या या विषयावर दिलासा देण्यासाठी किमान 31 मार्चनंतर कांदा निर्यातीसाठी खुला होईल अशी अपेक्षा होती. मात्र, आता केंद्र शासनाने नव्याने नोटिफिकेशन जारी करून निर्यातबंदी यापुढेही सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाने एक प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर केल्याचा संदेश गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अत्यंत संतप्त झाले आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा उत्पादकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांना (Farmers) कोणताही दिलासा देत नाही. मात्र, त्यांच्या खिशातील पैसाही काढून घेत आहे. त्यामुळे शेतकरी केंद्र सरकारवर व पर्यायाने भाजपवर अत्यंत संतप्त असून, त्याचे पडसाद येत्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार (Bharti Pawar) यांचा प्रचार सुरू आहे. कांदा निर्यातबंदी या विषयावर मतदारांकडून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. त्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. आता भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या अडचणीत भर पडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Bharti Pawar
MNS News: भाजप उमेदवारावर वक्तव्य करणं भोवलं, मनसे पदाधिकाऱ्यावर मोठी कारवाई

कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावर विरोधकांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध आवाज उठवला आहे. या प्रश्नावर चांदवड आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनेक आंदोलने झाली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर चांदवड येथे या प्रश्नावर खास शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शरद पवार (Sharad Pawar) तसेच शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांसह माकपच्या नेत्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात प्रचार करण्यासाठी विरोधी पक्षांना आयता मुद्दा मिळाला आहे. शिवाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या निर्णयाचे काय होते ते येत्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल.

(Edited By - Jagdish Patil)

R

Bharti Pawar
Raver Loksabha Election: खडसेंच्या 'माघारी'वर बोट ठेवत शरद पवारांच्या 'या' नेत्यानं रावेरमध्ये टाकला बाॅम्ब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com