Loksabha Election 2024 : भाजपकडून आणखी एक माजी आयपीएस अधिकारी लोकसभेच्या रिंगणात; मतदारसंघही ठरला

Pratagh Dighavkar News : प्रताप दिघावकर यांनी दोन ऑगस्ट २०२३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
Pratagh Dighavkar
Pratagh DighavkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय जनता पक्षाकडून आणखी एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. निवृत्त पोलिस अधिकारी प्रताघ दिघावकर यांनी धुळ्यातून मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मला भाजपने जबाबदारी दिली तर मी ती अत्यंत निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडेन, असे दिघावकर यांनी म्हटले आहे, त्यामुळे लोकसभेच्या रणांगणात आणखी अधिकारी उतरणार का, हे पाहावे लागेल. (Dhule Constituency)

प्रताप दिघावकर म्हणाले, मी दोन ऑगस्ट २०२३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने जर मला धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली, तर ती मी अत्यंत निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. माझा ३५ वर्षांचा सार्वजनिक जीवनाचा आणि आयपीएस सेवेचा अनुभव, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा दोन वर्षांचा अनुभव, तसेच माझ्या प्रशासकीय ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेच्या कल्याणासाठी करेन. (BJP News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्ष हा अत्यंत शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षात मेरिटवर सर्व गोष्टी केल्या जातात. लोकसभा उमेदवारी मिळावी, यासाठी मी कोणाच्याही गाठीभेटी घेतलेल्या नाहीत, पण भारतीय जनता पक्षात मेरिटला फार महत्त्व दिलं जातं. पक्षाची जी भूमिका असेल, त्याप्रमाणे पूर्णपणे समर्पित भावना ठेवून मी काम करेन, असेही दिघावकर यांनी स्पष्ट केले. (Retired IPS Officer News)

Pratagh Dighavkar
Shirur Loksabha Constituency : शिरूर लोकसभेसाठी अजितदादांचा मोठा डाव; बडा नेता लवकरच करणार घरवापसी

धुळे लोकसभा मतदासंघामध्ये मला चार ते पाच गोष्टींची कमतरता जाणवली. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा मंजूर झाला आहे. त्या ठिकाणी नेमलेल्या आयएएस अधिकाऱ्याची माझी चर्चा झाली आहे. इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित करून लोकांना कसं काम देता येईल, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. नार पार प्रकल्प, नदीजोड आणि पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करण्याच्या संदर्भात निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्यासोबत चार ते पाच बैठका झाल्या आहेत.

दिघावकर म्हणाले, धुळे लोकसभा मतदारसंघातील मनमाड-सूरत लोहमार्गाच्या सर्व्हेचे काम चालू झाल्याचे मी वाचले. मनमाड-इंदूर लोहमार्गाइतकाच हा मनमाड-सुरत लोहमार्ग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण गुजरातला भाजीपाला, फळे पोहोचविण्याचे काम धुळे मतदारसंघ करतो. रस्ते वाहतुकीसाठी जादा पैसे लागतात. मात्र, रेल्वेमार्गाच्या माध्यमातून त्याची अत्यंत कमी पैशात वाहतूक करता येते. कृषी उत्पादनावर आधारित प्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे. त्यातून लोकांना काम मिळून बेरोजगारीचा प्रश्न मिटेल.

Pratagh Dighavkar
Nanded Politics : अशोक चव्हाणांसोबतची कटुता संपली; कट्टर विरोधकाने दिली ग्वाही...

कांद्याला अत्यंत कमी भाव मिळतो. आज गुजरातमध्ये कांद्यावर प्रक्रिया करणारे अनेक प्रकल्प आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडेही प्रक्रिय उद्योग सुरू करणे महत्त्वाचे आहे. तसंच कापसाचं आहे. रोजगाराची संधी येथील युवकांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असेही दिघावकर यांनी नमूद केले.

दिघावकर म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी काम केले आहे. राम मंदिर, शेतकऱ्यांसंदर्भात योजना, विश्वकर्मा योजना यांसह तब्बल २७ योजना त्यांनी आणल्या आहेत. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यासाठी पाच लाखांपर्यंतच्या योजना आणल्या आहेत. विकासकामांच्या जोरावर आम्ही मतं मागणार आहे. उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड असून, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून युतीचे ४८ खासदार निवडून आणणार आहोत. यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी जोमाने कामाला लागला आहे.

Pratagh Dighavkar
Kalyan Loksabha Election 2024 : 'उद्धव ठाकरेंनी संतोष कवळेंना कल्याणची सुभेदारी दिली तर...' ; नीलेश सांबरेंची घोषणा!

निवडणुकीत प्रत्येकाला सहभागी होता येतं. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे, त्यामुळे या पक्षाकडून अनेक इच्छुक असू शकतात, तसे ते धुळ्यातून असतील. पण, मला खात्री आहे की भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड सर्व गोष्टी मेरिटवर ठरवतील, यात माझ्या मनात शंका नाही, असा विश्वासही दिघावकर यांनी व्यक्त केला.

R

Pratagh Dighavkar
Ajit Pawar Speech : ‘समोर कारटं अन्‌ मागं बायको बसलीय...नाय तर तुला सांगितलं असतं’; अजितदादांची पुन्हा मिश्किली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com