Lok Sabha Election 2024 : भारती पवार विरुद्ध भगरेंच्यात होणार लढत, पण दोघांनाही करावा लागणार 'या' गोष्टीचा सामना

Dindori Lok sabha Election 2024 : दिंडोरी मतदारसंघात सध्या कांदा निर्यात बंदी आणि कांदा निर्यात बंदीचा निर्णय आणि यामुळे द्राक्षांचे घसरलेले भाव हा अत्यंत ज्वलंत राजकीय मुद्दा आहे.
bhaskar bhagare bharati pawar
bhaskar bhagare bharati pawarsarkarnama

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ( Dindori Lok Sabha Constituency ) राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) भास्करराव भगरे ( Bhaskarrao Bhagare ) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

दिंडोरी मतदार संघात आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार ( Bharati Pawar ) यांना हा विकास आघाडीचे भगरे आव्हान देतील. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी शनिवारी ( 30 मार्च ) भगरे यांचे नाव जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. भारतीय जनता पक्षाचे एन. डी. गावित ( N D Gavit ) तसेच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ( Harishchandra chavan ) यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ ( Gokul Zirwal ) हे देखील महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी इच्छुक होते. या उमेदवारी विषयी गेले आठवड्यावर शक्ती प्रदर्शन आणि लॉबिंग सुरू होते. अखेर भगरे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीच्या चर्चांना विश्रांती मिळणार आहे.

bhaskar bhagare bharati pawar
Lok Sabha Election 2024 : लाल वादळ बिघडवणार शरद पवारांचं गणित?

भगरे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तालुक्यातील नेते श्रीराम शेटे यांच्या मर्जीतले उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. आता भगरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय आणि संपर्क यावर भर देऊन निवडणूक यंत्रणा उभे करावी लागणार आहे. या मतदारसंघात दिंडोरी, निफाड, येवला, कळवण येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. नांदगाव येथे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आणि देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. राहुल आहेर आमदार आहेत. सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला या मतदारसंघात खूप परिश्रम घ्यावे लागणार, असे सध्याचे चित्र आहे.

दिंडोरी मतदारसंघात सध्या कांदा निर्यात बंदी आणि कांदा निर्यात बंदीचा निर्णय आणि यामुळे द्राक्षांचे घसरलेले भाव हा अत्यंत ज्वलंत राजकीय मुद्दा आहे. या विषयावर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात सातत्याने आंदोलन करण्यात आले आहेत. शेतकरी या प्रश्नावर अत्यंत संतप्त आहेत. त्याचे पडसाद येत्या लोकसभेच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजप देखील धास्तावलेला आहे. कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याभोवतीच ही निवडणूक फिरणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

bhaskar bhagare bharati pawar
Chhagan bhujbal News : नाशिकच्या उमेदवारीवरून छगन भुजबळांचे मोठं विधान; 'माझा निर्णय थेट दिल्लीतून'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com