Ahmednagar News: नगरच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवावा, अशी मागणी केली आहे. मनसे पदाधिकारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत अचानक पुढे आल्याने इतर राजकीय पक्ष अलर्ट मोडवर गेले आहेत. (Lok Sabha Election 2024 )
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी शिर्डीमधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मनसेने उमेदवारी करावी, अशी मागणी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी केल्यास आम्ही एकदिलाने काम करू आणि विजय खेचून आणू, असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज ठाकरे यांना तसे निवेदन देत आग्रह धरला. यानंतर राज ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कसे काम करत आहेत, याचा आढावा घेतला. सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, दत्तात्रय कोते यांनी सांगितले.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा नगर जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. स्वच्छ प्रतिमा, मनसेची काम करण्याची आक्रमक स्टाईल आणि राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्यास शिर्डी मतदारसंघात नक्कीच परिवर्तन होईल, असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांना विजय मिळवून देण्याचे काम नक्की करू, अशी ग्वाही देखील कार्यकर्त्यांनी दिली.
नगर शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी करताच सत्ताधारी शिवसेना (Shivsena) शिंदे गट सावध झाला आहे. तसेच महाविकास आघाडी देखील अलर्ट झाली आहे. मनसेने येथे उमेदवार दिल्यास काय परिणाम होईल, याची खातरजमा वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहे.
विशेष करून शिवसेना ठाकरे गटाकडून माहिती घेतली जात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघबाबत शिवसेना ठाकरे गट काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.