Sangli Constituency 2024 : सांगली मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यामुळे सांगलीची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal News) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेंडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एक पत्र सापडले आहे. त्यात भुजबळ यांचा उल्लेख आहे. भुजबळ यांनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, तशीच माघार शेंडगे यांनी देखील घ्यावी, असा उल्लेख त्यात आहे.
शेंडगे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर मंत्री भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी कोणालाही घाबरून लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतलेली नाही. असे हल्ले माझ्यावर अनेकदा झाले आहेत. शिवीगाळ झाली आहे. अनेकांनी धमक्या दिल्या आहेत. मात्र मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला जे करायचे तेच करतो.
भुजबळ यांनी शेंडगे यांच्या वाहनावर झालेला हल्ला अयोग्य आहे, असे म्हटले आहे. शेंडगे हे ओबीसी (OBC) चळवळीतील नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात जसा मत देण्याचा अधिकार आहे, तसेच निवडणूक लढविण्याचा अधिकार देखील आहे. कोणालाही तो अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे भुजबळ म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्यांना मते द्यायची त्यांनी द्यावी. ज्यांना द्यायची नाही त्यांनी देऊ नये. मात्र उमेदवारीच करू नये, अशी धमकी किंवा भूमिका कोणालाच मान्य होणारी नाही. यासंदर्भात पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून यातील दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.
सहानुभूतीवर मते मिळत नाहीत
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षात फूट पडली. अशा स्थितीत ते निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती आहे, असे विधान भुजबळ यांनी नुकतेच केले होते. त्याबाबत देखील भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात फूट पडली. त्यामुळे काही लोकांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. ज्या लोकांचे या नेत्यांवर प्रेम आहे ते सभेला गर्दी करतात. मात्र मतदान करताना ते सहानुभूतीने करत नाहीत. देशाचे नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकेल, याचा विचार करतात. त्यामुळे मतदान मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच होईल, याचाही त्यांनी पुनर्विचार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.