Nashik Constituency 2024: आमदारांची मनधरणी करण्यात शिवसेना शिंदे गटाची होते दमछाक !

Mahayuti Politics, MLAs are still away from Hemant Godse's Campaign : भाजप, अजित पवार गटाचे आमदार प्रचारापासून अलिप्त असल्याने गोडसेंच्या चिंतेत भर
Girish Mahajan- Chhagan Bhujbal-Hemant Godse
Girish Mahajan- Chhagan Bhujbal-Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचारात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाचही आमदार अलिप्त आहेत.

नाशिक मतदारसंघ उमेदवारीच्या वादामुळे गेले दोन महिने चर्चेत होता. महायुतीच्या तीनही पक्षांना नाशिकची जागा हवी होती. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार असल्याने त्यांना उमेदवारीच्या आश्वासनामुळे त्यांनी ठाकरे गटातून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.

मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष जागा वाटपावेळी भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर दावा केला होता. भाजपचे विविध इच्छुक गेले वर्षभर येथे निवडणुकीची तयारी करीत होते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद निर्माण झाले. हे मतभेद अद्यापही दूर झालेले दिसत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan- Chhagan Bhujbal-Hemant Godse
Sushma Andhare News: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश...

गेले दोन दिवस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाशिक (NASHIK) मतदारसंघातील राजकीय सुसूत्रतेसाठी पुढाकार घेतला होता. या संदर्भात विविध बैठका झाल्या. मात्र या बैठकांना भारतीय जनता पक्षाचे शहरातील सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि सर्व जाहिरे हे आमदारांनीही लांब राहण्याचे पसंत केले.

या आमदारांनी बैठकीला उपस्थित रहावे यासाठी सातत्याने संपर्क करण्यात आला होता. मात्र या आमदारांनी विविध वैयक्तिक कारणे सांगत बैठकीपासून स्वतःला अलिप्त ठेवले. त्यामुळे महायुतीला पुढील प्रचारात निर्माण करण्यात मेहनत घ्यावी लागणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) हे महायुतीच्या प्रचारात प्रमुख घटक आहेत. स्वतः भुजबळ या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांना उमेदवारीचे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र शिवसेना शिंदे गटाने नाशिकची जागा सोडण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात शेवटपर्यंत किल्ला लढवत होते. त्यामुळे भुजबळ समर्थक देखील नाराज आहेत. हे लपून राहिलेले नाही. ही नाराजी दूर करण्यासाठी शिंदे गटाच्या आणि भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. भाजपचे केंद्रीय निरीक्षक डॉ दिनेश कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Girish Mahajan- Chhagan Bhujbal-Hemant Godse
Congress News: अखेर ठरलं; राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार, अमेठीतून केएल शर्मा मैदानात

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह विविध नेत्यांनी भुजबळ यांच्याशी उमेदवारी जाहीर करण्याआधी एकमत व्हावे यासाठी चर्चा केली. मात्र शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या गोंधळातच दोन दिवसापूर्वी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. खासदार गोडसे यांनी दोन महिन्यांपासूनच प्रचाराची सर्व तयारी केली होती. त्यामुळे त्यांचा प्रचार लगेचच सुरू झाला आहे.

महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र करून नेत्यांमधील समन्वय निर्माण करण्यासाठी मात्र त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागतील. त्यासाठी आणखी काही कालावधी जाऊ शकतो. त्यात पाचही आमदार प्रचारात कसे सहभागी होतील, त्यासाठीचे राजकीय मनोमिलन कसे होते याची उत्सुकता आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Girish Mahajan- Chhagan Bhujbal-Hemant Godse
Nagar News: भाजप उमेदवाराला पाठिंबा देणे भोवलं, माजी आमदार विजय औटींचे निलंबन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com