Nashik Loksabha Election : 'शांतिगिरीं'नी नाशिकची 'शांती' केली भंग? इच्छुकांची धडधड वाढली

Loksabha Election : शांतीगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला असला तरी ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत का नाही, याचे उत्तर शांतीगिरी महाराज यांनी अजुनही दिलेले नाही. याची खातरजमा करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शांतिगिरी महाराज शक्यतो कोणाशीच बोलत नाहीत
 Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj sarkarnama

Shantigiri Maharaj News : नाशिक लोकसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या फारसा चर्चेत नसतो. यंदा महायुतीत तीन पक्ष एकत्र आले आणि या मतदारसंघाला अचानक महत्त्व आले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरीही उमेदवार जाहीर होऊ शकलेला नाही. त्यामुळे सध्या नाशिकची चर्चा राज्यभर प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून होत आहे.

महायुतीचा mahayuti नाशिकचा उमेदवार कोण? या विषयावर स्थानिक पदाधिकाऱ्यांपेक्षाही कितीतरी अधिक खल राज्यातील नेत्यांनी केला आहे. महिनाभर यावर चर्चा चर्वण सुरू आहे. अगदी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी या मतदारसंघातून ओबीसी कार्ड खेळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ही पुढे आली. त्यामुळे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांपासून तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे असे अनेक नेते नाशिकच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात सोडून बसले होते. मात्र शांतिगिरी महाराजांच्या आज (सोमवारी) केलेल्या दाव्याने सगळ्यांनाच अचंबित केले.

 Shantigiri Maharaj
PM Narendra Modi News : 'संदेशखाली'प्रमाणे मोदींकडून कर्नाटकातील 'त्या' प्रकरणातही देशाला अपेक्षा!

नाशिक मतदारसंघातून Nashik lok sabha constituency उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान खासदार गोडसे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरापासून अयोध्येतील श्रीरामापर्यंत आणि संसारीच्या मारुतीपासून तर जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची भवानी अशा सगळ्या मंदिरांचे उंबरे झिजवले. त्यांचा कित्ता गिरवत शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर यांनीही वर्षा बंगल्यापासून सुरुवात करीत शिर्डीच्या साईबाबापर्यंत अनेक देवांना साकडे घातले. यातला कोणता देव कोणाला प्रसन्न होईल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र इच्छुक राजकीय नेते देव देव करीत असताना शांतिगिरी महाराजांनी Shantigiri Maharaj आज (सोमवारी) शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करून नाशिकची 'शांती' भंग केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यावेळी महाविकास आघाडीचे सिन्नर आणि नाशिक दोन्ही मतदारसंघातील उमेदवार पक्षाच्या नेत्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच शक्तीप्रदर्शन करीत होते. तिथेही महाराजांना शिंदे गटाकडून चर्चा पसरली. त्यामुळे गेले दोन महिने शिंदे गटाच्या उमेदवारासाठी दिवस रात्र एक केलेल्या नेते आणि त्यांच्या समर्थकांना अक्षरशः धक्का बसला.

खुलासा झालाच नाही

शांतीगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला असला तरी ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत का नाही, याचे उत्तर शांतीगिरी महाराज यांनी अजुनही दिलेले नाही. याची खातरजमा करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण शांतिगिरी महाराज शक्यतो कोणाशीच बोलत नाहीत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी आपले मौनव्रत असल्याचे सांगितले. त्यामुळे हा गुंता अधिकच वाढला. अनेकांचा या बातमीवर विश्वासच बसेना. तो अद्यापही बसलेला नसावा अशी एकंदर स्थिती आहे.

सर्वच पक्षांशी केला होता संपर्क

शांतिगिरी महाराज यांनी नाशिक मधून उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांची संपर्क केला होता. अगदी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना शांतिगिरी हे उत्तम उमेदवार ठरतील असे वाटत होते. मात्र शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनीही त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. मनसेचे राज ठाकरे यांच्याशी देखील शांतिगिरी यांनी संपर्क केला होता परंतु त्यांची भेट हुकली. या सर्व पार्श्वभूमीवर आज कोणतीही चर्चा आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना शांतिगिरी यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे अर्ज दाखल केला. शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे महायुतीचे नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांसह नाशिकची 'शांती' काही काळभंग झाली हे मात्र नक्की.

(Edited By Roshan More)

 Shantigiri Maharaj
Maval Lok Sabha Constituency : मावळमध्ये उदंड झाले अपक्ष; दोन संजोग पाटलांसह 33 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com