Chhagan Bhujbal News : भुजबळांचे राजकारण संपवून देव-देव करायला पाठवू; सकल मराठा समाजाच्या शिलेदाराची प्रतिज्ञा!

Lok Sabha Election 2024 : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उमेदवार देण्याबाबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Politics : जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात सकल मराठा समाजाची आज बैठक झाली. या बैठकीत आपला उमेदवार द्यायचा की नाही? यावर चर्चा झाली. येथे काही दिवसांत नाशिक मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांचा विचार करून उमेदवारी देण्याचा निर्णय होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

Chhagan Bhujbal News
Ambadas Danve On BJP : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंचवीस टक्के दुसऱ्या पक्षातून आलेले... दानवेंचा टोला

नाशिक मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. यामध्ये आज सकल मराठा समाजाने भर टाकली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उमेदवार देण्याबाबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, उमेदवार देण्याबाबत एकमत होऊ शकले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक शिवाजी सहाने यांनी, 'समाजाने उमेदवार देताना राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्यांसाठी काम करू नये. जे निवडणुकीबाबत गंभीर त्यांना एकत्र करून उमेदवार देण्याचा विचार करावा. जिंकण्यासाठीच लढले पाहिजे. राजकीय पक्षांनी नाकारल्यानंतर समाजाकडे आलेल्यांचा उमेदवारीसाठी फारसा विचार करू नये. कारण ते समाजापेक्षा राजकीय पक्षाचे बांधील आहेत. समाजाशी प्रामाणिक असते तर आधी समाजाकडे आले असते,' असे ते म्हणाले.

Chhagan Bhujbal News
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

या वेळी सहाने यांनी संभाव्य उमेदवार व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "भुजबळ यंदा नाशिकमधून (Nashik) उमेदवारी करण्याचा विचार करीत आहेत. मराठा समाजाविषयी वाईट भावना ठेवणाऱ्या भुजबळ यांना या निवडणुकीत चोख उत्तर देण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी दोनदा त्यांचा पराभव केलेला आहे. यंदा इजा, बिजा, तिजा करून त्यांना घरी पाठवू. त्यांचे राजकारण पूर्णतः संपुष्टात आणू आणि देव देव करण्यासाठी पाठवून देऊ."

Chhagan Bhujbal News
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची लोकसभेसाठी चर्चा बोलकी आहे. हे कारस्थान त्यांनी फार पूर्वी रचले होते. पूर्णतः ही भाजपची स्क्रिप्ट होती. त्यानुसार भुजबळ सामाजिक तेढ निर्माण करणारी भाषणे करीत होते. मराठा आणि ओबीसी समाजात दुही निर्माण करून त्याचा उपयोग निवडणुकीसाठी करण्याचा त्यांचा हेतू होता, त्यामागे भाजप होती, हेदेखील दिसते. मात्र मतदार त्यांना जोक धडा शिकवतील, असेही सहाने म्हणाले.

(Edited by - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com