Shirdi News : शिर्डी लोकसभा मतदारसंघ तसा अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात येत असला तरी आरक्षण असल्यानं दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार येथे देण्यात येताना दिसून येते. शिवसेनेनं (ठाकरे गट) येथे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांना उमेदवारी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सदाशिव लोखंडे यांनी सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांच्या काळात लोखंडेंच्या संपत्तीत सहा कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि त्यांच्या पत्नी नंदी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये सहा कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आलिशान वाहने, सोने नाण्यांसह 16 कोटी रुपयांची संपत्ती लोखंडे दाम्पत्याकडे आहे. मुंबईतील रहिवासी असल्याचे गेल्यावेळी सांगितले होते. या वेळी त्यांनी शिर्डीतील रहिवाशी आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सदाशिव लोखंडे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. व्यवसाय शेती, समाजसेवा आहे. साखर कारखाने, शिक्षण संस्था नाहीत, असे म्हणतात. जिरायत भागातील कार्यकर्ते आहोत, असे सांगतात पण प्रत्यक्षात कोट्यवधीचे धनी आहेत.
सदाशिव लोखंडे यांच्याकडे 2 कोटी एक लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पत्नीकडे दोन कोटी 47 लाख 56 हजार 938 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्वसंपादित स्थावर मालमत्तेची किंमत 11 लाख 22 हजार 728 रुपये आहे. पत्नीकडे 3 कोटी 89 लाख 68 हजार 451 रुपयांची मालमत्ता आहे.
सदाशिव लोखंडे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. सदाशिव लोखंडे यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मूल्य 4 कोटी 69 लाख रुपये आहे, तर त्यांची पत्नी नंदा यांच्या मालमत्तेचे आजचे मूल्य 12 कोटी 14 लाख रुपये एवढे आहे.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.