Sujay Vikhe Patil Net Worth : सुजय विखेंनी दीड कोटी रुपये घेतले 'हातउसने', तर संपत्तीत दुपटीने वाढ

Sujay Vikhe Patil News : खासदार सुजय विखे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून एकही गुन्ह्याची नसल्याचं सांगितलं आहे.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patilsarkarnama

Ahmednagar News : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे ( Sujay Vikhe Patil ) यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत साडेअकरा कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विखे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, तर तीन कोटी रुपयांचं कर्ज विखे यांच्यावर असल्याचं प्रतिज्ञापत्रावरून समोर आलं आहे.

खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe Patil ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार सुजय विखेंनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम आणि स्थावर अशी एकूण वैयक्तिक मालमत्ता 23 कोटी 11 लाख 40 हजार 478 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. पाच वर्षांपूर्वीच्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आपली मालमत्ता 11 कोटी 17 लाख 56 हजार 439 रुपये असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते. म्हणजेच पाच वर्षांत त्यांच्या वैयक्तिक संपत्ती 11 कोटी 93 लाख 94 हजार 39 रुपयांची वाढ झाली आहे. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांची पाच कोटी 82 लाख 2 हजार 263 रुपये एवढी मालमत्ता जाहीर केली आहे. सुजय विखे यांच्यावर अवलंबून असल्याने दोन व्यक्तींच्या नावावर एकूण 99 लाख 26 हजार 248 रुपयांची मालमत्ता आहे.

Sujay Vikhe Patil
Devendra Fadnavis News : नगरच्या नामांतराला फडणवीसांची विखेंच्या रॅलीतून फुंकर; नेमके काय म्हणाले?

सुजय विखे यांनी प्रतिज्ञापत्राप्रमाणे यंदाही त्यांनी स्वमालकीचे वाहन नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुजय विखे यांच्यावर 3 कोटी 64 लाख 13 हजार 209 रपये कर्ज आहे. त्यात दोन कोटी 24 लाख 13 हजार 209 रुपये प्रवरा सहकारी बँकेचे गृहकर्ज आहे. एक कोटी 40 लाख रुपये अनिशा ट्रेडिंग कंपनीकडून उसनवारीने घेतले आहे. सुजय विखे यांच्यावर कोणत्याही प्रकाराचे गुन्हे दाखल नसल्याचे म्हटले आहे. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

Sujay Vikhe Patil
Sharad Pawar on Vikhe: विखेंचा विषय पवारांनी एकाच वाक्यात संपवला; हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com