Uddhav Thackeray News : शिर्डी दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का! मोठ्या नेत्याचा राजीनामा

Shivsena Nitin Autade : 'अंतर्गत गटबाजीमुळे अनेक नव्या- जुन्या शिवसैनिकांच्या विचारात भिन्नता आली.2017 मध्ये मी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्यानंतर गेली सात वर्ष पक्षाचे निष्ठेने काम केले
Uddhav Thackeray,Nitin Autade
Uddhav Thackeray,Nitin Autadesarkarnama
Published on
Updated on

मोबीन खान

Nagar : जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवार (ता. 13) आणि बुधवार (ता.14) असे दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर विभागाचे नगर जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. संकुचित विचाराच्या वृत्तींमुळे आपल्याला पदाला न्याय देता येत नसल्याने आणि पक्षातील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत, असे औताडे यांनी राजानीमा पत्रात म्हटले आहे. (Uddhav Thackeray News)

Uddhav Thackeray,Nitin Autade
Sanjay Raut : "दाढी तुमची लंका जाळून टाकेल", CM शिंदेंच्या विधानावर राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जनसंवाद यात्रेच्या तोंडावर नितीन औताडेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 'अंतर्गत गटबाजीमुळे अनेक नव्या- जुन्या शिवसैनिकांच्या विचारात भिन्नता आली.2017 मध्ये मी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्यानंतर गेली सात वर्ष पक्षाचे निष्ठेने काम केले. या सात वर्षाच्या कालावधीत आलेल्या संपर्कातून आपल्या संयमी आणि प्रेमळ स्वभावाचा जवळून अनुभव घेता आला हे, मी माझे भाग्य समजतो.' असे आपल्या राजीनाम पत्रात औताडे म्हटले आहेत.

शिवसैनिक म्हणून काम करत राहणार

संकुचित विचाराच्या लोकांकडून काम करण्यात अडचणी येत होत्या. मुक्तपणे काम करता येत नसल्याबाबत आपण जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या कानावर सुद्धा या गोष्टी घातल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडूनही काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपला केवळ आर्थिक वापर होतो की काय, अशी भावना मनात निर्माण झाली. हा मनस्ताप नको म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण एक शिवसैनिक म्हणून यापुढेही काम करीतच राहणार आहोत, असे नितीन औताडे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष्य

महिन्याभरापूर्वी संक्रांतीच्या मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शहरात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय नितीन औताडे यांनी सुरू केले होते. परंतु, अवघ्या एका महिन्यात त्यांनी अचानक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 14 तारखेच्या जनसंवाद यात्रेच्या तोंडावर नितीन औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चर्चेला कोपरगाव शहर व ग्रामीण भागात उधाण आले आहे. दरम्यान, तालुकाप्रमुख बाळासाहेब राहाणे हे औताडे यांचे समर्थक मानले जातत ते काय निर्णय घेतील या विषयी औताडे यांना विचारले असता 'ते तालुकाप्रमुख पदावर चांगले काम करीत आहेत. त्यांचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे त्या बाबतीत मी बोलणे योग्य नाही.' असे म्हणत या विषयावर भाष्य करणे टाळले.

(Edited By Roshan More)

Uddhav Thackeray,Nitin Autade
Pune BJP News: मोदींसाठी बाईक रॅली, पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच फिरवली पाठ; देवधरांच्या उमेदवारीला सुरुंग ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com