Pune BJP News: मोदींसाठी बाईक रॅली, पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच फिरवली पाठ; देवधरांच्या उमेदवारीला सुरुंग ?

Sunil Deodhar : सुनील देवधरांना एकटा पाडून एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीला सुरुंग लावण्याचे काम इतर इच्छुक करत तर नाहीत ना ?
Namo Pune Bike rally
Namo Pune Bike rally Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल 500 वर्षाच्या संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राममंदिराची उभारणी केली. त्यात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी 'नमो पुणे अभिवादन' या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले करण्यात आले. या रॅलीचे नियोजन लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे सुनील देवधर यांनी केले होते. मात्र, या आयोजनापासून भाजपचे इतर पदाधिकारी दूरच राहिल्याचे पाहायला मिळाले. (Pune BJP News)

गेल्या काही दिवसांपासून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांमध्ये 'इव्हेंट वॉर' रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजप इच्छुकांकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा धडाका लावण्यात आला आहे.

या माध्यमातून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा या इच्छुकांकडून करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलून आणि प्रचंड गर्दी जमा करून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपला दावा मजबूत करण्याचं काम करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Namo Pune Bike rally
Sharad Pawar News : 'शेवटची निवडणूक म्हणून भावनिक..' अजितदादांच्या वक्तव्याला पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

या 'इव्हेंट वॉर'मध्ये मुळीक आणि मोहोळ यांनी आघाडी घेतली असतानाच आता नॉर्थ ईस्टमध्ये भाजपाचा विजय सुकर करणारे आणि पूर्वी 'आरएसएस'मध्ये संघटनात्मक काम करून सध्या भाजपमध्ये सक्रिय झालेले सुनील देवधर ही टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. देवधर यांनी मागील काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. या माध्यमातून त्यांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी 'नमो पुणे अभिवादन'या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

भाजप कार्यालय, कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे येथून या रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी भाजपचे युवा नेते कुणाल टिळक, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहर चिटणीस महेश पवळे आणि दिनेश होले वगळता कोणतेही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये पुण्यातील भाजप पदाधिकारीच नसल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.

दरम्यान, पुणे शहर भाजपमध्ये लोकसभेसाठी स्थानिकच उमेदवार द्यावा, असं मतप्रवाह आहे. भाजपमधील अंतर्गत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनील देवधर हे बाहेरचे बाहेरचे उमेदवार वाटत आहेत. त्यामुळे बाहेरून येऊन देवधर यांनी लोकसभा उमेदवारीसाठी प्रयत्न करणे फारसं जास्त कोणाला रुचलेलं नाही.

याचाच परिणाम म्हणून देवधर यांच्या कार्यक्रमांपासून भाजपचे पदाधिकारी काहीसं अंतर ठेवूनच राहत असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे, असं जाणकार सांगतात. त्यामुळे देवधरांना एकटा पाडून एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीला सुरुंग लावण्याचे काम इतर इच्छुक करत तर नाहीत ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Namo Pune Bike rally
Sharad Pawar : योगी आदित्यनाथ यांचे शिवरायांबाबत विधान; शरद पवारांचे सडेतोड उत्तर, काय आहे प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com