Lok Sabha Election: लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का! 5 वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री शिंदे गटात प्रवेश करणार

Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे. कारण 5 वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Babanrao Gholap News: शिवसेनेत Shivsena फूट पडल्यानंतर मागील वर्षभरात ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray गटाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election तोंडावर मोठा धक्का बसणार आहे.

नाशिकमधील (Nashik) शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे, तर शिवसेनेत आपल्यावर अन्याय झाला असून राजीनामा देऊन दोन महिने झाले तरी आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही, त्यामुळे मी शिंदे गटात जात असल्याचं घोलप यांनी सांगितलं आहे. (Former Minister Babanrao Gholap join Eknath Shinde Group)

बबनराव घोलप Babanrao Gholap यांचा आज (6 एप्रिल) रोजी संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. शिर्डीची Shirdi उमेदवारी डावलल्याने घोलप नाराज होते. त्यामुळे ते आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, तर बबनराव घोलप यांनी आपण शिंदे गटात का जात आहोत याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Kalyan Lok Sabha 2024 :'गणपत गायकवाडांना जामीन मिळेल या भ्रमात राहू नका', शिंदेंच्या समर्थकांनी सुनावले

घोलप म्हणाले, "माझ्यावर अन्याय झाला, याबाबत मी संजय राऊत यांना सांगितलं होतं. परंतु, त्यांनी काहीही केलं नाही. मी राजीनामा देऊन 2 महिने झाले तेव्हापासून माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही म्हणून मी शिंदे गटात जात आहे. मिलिंद नार्वेकर Milind Narvekar कोण आहेत, त्यांचे म्हणणे का ऐकून घेत आहेत, एका शिपाई माणसाचं ऐकूण घेतायत पण आम्ही 50 वर्षे कामे केली तरीही आमचं ऐकूण घेतलं जात नाही. पक्ष फुटतो तरीही त्यांचे ऐकतात त्याला का एवढे महत्त्व देत आहेत? मला संपर्कप्रमुख पदावरून का काढले? याचे उत्तर नाही," असा हल्लाबोल करत घोलप यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Kalyan Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ फडणवीसच करणार, बहुमताने निवडून आणणार

माजी मंत्री आणि 5 वेळा आमदार

बबनराव घोलप हे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, तर नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील घोलप गैरहजर होते. तेव्हापासूनच ते ठाकरेंच्या सेनेची (Shivsena) साथ सोडणार अशा चर्चा सुरू होत्या. माजी मंत्री असलेले बबनराव घोलप हे पाच वेळा आमदार राहिले आहेत, तर आता शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com