Kalyan Lok Sabha 2024 :'गणपत गायकवाडांना जामीन मिळेल या भ्रमात राहू नका', शिंदेंच्या समर्थकांनी सुनावले

Kalyan Lok Sabha News : भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युतीत घोळ घालणाऱ्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे.
Ganpat Gaikawad Shrikant Shinde
Ganpat Gaikawad Shrikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : कल्याणचा शिंदे गटाचा उमेदवार श्रीकांत शिंदे हे उमेदवार असणार आहेत. मात्र, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक घेत श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही, अशी थेट भूमिका घेतली. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर गणपत गायकवाड यांच्या जामिनावर भाष्य करत शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने गायकवाड समर्थकांना डिवचले आहे.

Ganpat Gaikawad Shrikant Shinde
Kalyan Lok Sabha 2024 : कल्याणमध्ये भाजपनं वाढवलं श्रीकांत शिंदेंचं टेन्शन; दिला 'हा' इशारा...

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांचा अपप्रचार करून गणपत गायकवाड (Ganpat Gaikawad) यांना जामीन मिळेल, अशा भ्रमात गायकवाड यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांनी राहू नये, असा इशारा लांडगे यांनी दिला. तसेच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युतीत घोळ घालणाऱ्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत शिंदे हे सलग दोनदा कल्याण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यंदा त्यांना हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मात्र, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याने ते तुरुंगात आहेत. त्यामुळे गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) नेते देखील याला प्रत्युत्तर देत आहेत. सलग तिसऱ्यांदा श्रीकांत शिंदे विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना विरोध केला असला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. श्रीकांत शिंदेच कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणादेखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

R

Ganpat Gaikawad Shrikant Shinde
No Road No Vote : ‘रस्ता नाही तर मतदान नाही’; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मतदानावर बहिष्कार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com