Prakash Ambedkar On MVA Alliance : 'वंचित'चा 'एकला चलो'चा नारा; महाविकास आघाडीसोबत समझोता नाहीच!

Loksabha Election 2024 : आंबेडकर यांनी सांगितले की, आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये कोल्हापूर आणि नागपूरच्या दोन जागांवर पाठींबा जाहीर केला आहे.
Prakash Ambedkar, Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Prakash Ambedkar, Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : विदर्भातील उमेदवार वंचित बहुजन आघाडीकडून घोषित करण्यात आले आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वंचित अजूनही आपल्या सोबत येईल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. मात्र, महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच मतभेद आहेत. मैत्रीपूर्ण लढतीच्या संकल्पना पुढे येत आहेत. त्यामुळे आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमचे स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहोत, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे. वंचितच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची कोंडी होणार आहे.

Prakash Ambedkar, Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Satara Loksabha 2024 : भाजपला रोखण्यासाठी साताऱ्यात पवारांनी टाकला डाव; जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाणांमध्ये खलबत्तं

महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. महाविकास आघाडीचे भांडण आधी मिटवा. ते मिटलं की, आम्हाला मतदारसंघ मागायला सोपं होईल. परंतु, वंचित आम्हाला जागा देत नाही. कोणत्या पाहिजे ते सांगत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यांचा समझोता होत नाही, त्याठिकाणी आम्ही जाऊन त्यामध्ये बिघाड होण्याची परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्वाच्या भूमिका घेतल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

आंबेडकर यांनी सांगितले की, आम्ही काँग्रेसला (Congress) सात जागांवर पाठींबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये कोल्हापूर आणि नागपूरच्या दोन जागांवर पाठींबा जाहीर केला आहे.उरलेल्या जागांची त्यांच्याकडून यादी येईल. त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देवू.

काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे आठ ठिकाणी पराभव

आमच्या आठ जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पडल्या. त्या आठ जागांमध्ये हिंदू मतं मिळाली पण मुस्लीम मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले. वंचितला सोबत घेण्याच्या महाविकास आघाडीला दोन अडचणी होत्या. एक भाजप, आरएसएस आणि मोदी यांना अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे. दुसरी विस्थापितांच्या सत्तेला प्रस्थापितांचा कायम विरोध राहला आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar, Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Dindori Lok Sabha Constituency : भगरेंना सप्तशृंगी देवी पावली; मतदारांनी देणग्या देऊन केले राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे स्वागत!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com