Gram Panchayat Election : हर्षवर्धन पाटलांना स्वकीयांनीच घेरले...

Bawda Gram Panchayat : बावडा ग्रामपंचायतीसाठी भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते अशोक घोगरे यांची युती झाली आहे.
Bawda Gram Panchayat Election
Bawda Gram Panchayat ElectionSarkarnama
Published on
Updated on

दीपक शिंदे

Indapur News : इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी उद्या (ता. ४ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. त्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत अर्थातच माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे गाव असलेल्या बावड्यात होण्याची शक्यता आहे. कारण, पाटील यांना गावातच स्वकीयांकडून आव्हान उभे करण्यात आले आहे. (Harshvardhan Patil is challenged by his own people in Bawda Gram Panchayat elections)

बावडा ग्रामपंचायतीसाठी भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते अशोक घोगरे यांची युती झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काळेश्वर ग्रामविकास पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bawda Gram Panchayat Election
Rajasthan Assembly Election : राजस्थानच्या निवडणुकीत शिंदे गट उमेदवार उभे करणार; बडा नेता शिवसेनेच्या गळाला

माजी मंत्री, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेटफळ तलाव समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पद्यमवती ग्रामविकास पॅनेल निवडणुकीत उतरला आहे. पाटील यांना इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा हर्षवर्धन पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेते महादेव घाडगे, माजी उपसरपंच धैर्यशील पाटील, विविध सहकारी सोसायटीचे संचालक अभिजित घोगरे हे सहकार्य करणार आहेत.

माजी सभापती प्रशांत पाटील यांनी काही वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर पंडितराव पाटील, महादेव घाडगे, माजी उपसरपंच धैर्यशील पाटील हे आमदार भरणे यांच्या गोटात सामील झाले आहेत. मात्र, हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले अशोकराव घोगरे हे या वेळी त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे स्वकीयांना घेरलेले असतानाही घोगरे यांची राजकीय मदत माजी मंत्री पाटील यांच्या कामी येते का, हे पाहावे लागेल.

स्थापनेपासूनच बावडा ग्रामपंचायत ही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे. प्रखर विरोध होऊनही त्यांनी आतापर्यंत ग्रामपंचायत हातातून निसटू दिलेली नाही. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. हर्षवर्धन पाटील राहत असलेल्या वार्डामध्ये त्यांची भावजय लढत आहे. त्यांना माजी सैनिकाच्या घरातील महिलेने आव्हान दिले आहे.

Bawda Gram Panchayat Election
Maratha Reservation : अण्णा बनसोडे, श्रीरंग बारणेंची झाकली मूठ...‘तो’ मोठा निर्णय घेण्याची वेळच आली नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे यांना मागील पंचवार्षिकमध्ये बावडा गावातून मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे बावड्यावर लक्ष ठेवून असलेल्या भरणेंनी ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल संपूर्ण ताकदीनिशी उतरवले आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे बंधू, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी काही वर्षांपूर्वीच भरणे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. बावड्यातील ज्येष्ठ नेते महादेव घाडगे, शेटफळ तलाव समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, माजी उपसरपंच धैर्यशील पाटील यांच्यासह अनेकांनी नीरा-भीमा कारखान्याच्या ऊसबिल, शेतीच्या पाण्यावरून थेट आव्हान देत हर्षवर्धन पाटील यांना घेरले आहे.

Bawda Gram Panchayat Election
Sangola Gram Panchyat Election : प्रचार करताना हृदयविकाराच्या धक्क्याने ग्रामपंचायत उमेदवाराचा मृत्यू; निवडणूक स्थगित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com