Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा कसब्यात फटका; आता बारामतीत काय होणार?

Baramati Loksabha Election : या वक्तव्यामुळे स्थानिक बारामतीकर नाराज झाले असून त्याचा परिणाम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये झाला असल्याचं अजित दादा समर्थकांचे म्हणणं आहे.
chandrakant patil sharad pawar ajia pawar
chandrakant patil sharad pawar ajia pawarsarkarnama

Pune News : कसबा पोटनिवडणुकी वेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं हू इज धंगेकर हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत राहीलं. त्याचा फटका भाजपाला बसला असल्याचं बोललं जात. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट शरद पवारांना आव्हान देत बारामतीमधून शरद पवारांचा पराभव करण्याची भाषा केली होती. या वक्तव्यामुळे स्थानिक बारामतीकर (Baramati) नाराज झाले असून त्याचा परिणाम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये झाला असल्याचं अजित दादा समर्थकांचे म्हणणं आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये (Baramati) जाऊन शरद पवारांना पराभूत करणार असल्याचे सांगत बघून घेण्याची जी भाषा केली. त्याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानावर झाला असल्याचा अजित पवार समर्थकांच म्हणणं आहे. याबाबतची खदखद नुकतीच महायुतीच्या बैठकीमध्ये बाहेर पडली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

chandrakant patil sharad pawar ajia pawar
Ajit Pawar : ‘गेली ३५ वर्षांत ह्या अजित पवारला कोणी पोच मागितली नाही; हा गडी मला पोच मागतोय’

यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांच्या वक्तव्यामध्ये काही तथ्य नव्हतं. नंतरच्या काळात आम्ही त्यांना पुण्यामध्ये काम बघण्याची विनंती केली आणि बारामतीमध्ये आम्ही काम पाहतो असं सांगितलं . त्यांनी शरद पवारांबाबत तसं बोलायला नको होतं. मात्र ते तसं का बोलून गेले हे माहीत नाही. परंतु त्यानंतर त्यांनी त्याबाबत अवक्षरी काढलेलं नाही. या निवडणुकीत शरद पवार हे उभेच नव्हते तर त्यांचा पराभव करण्याचं संबंध येतोच कुठे ? निवडणुकीला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या उभ्या होत्या त्यामुळे पराभव यांचाच होणार आहे ना असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले जे चंद्रकांत पाटील बोलले ते चुकीच होतं. त्यांनी असं बोलायला नको होतं. जे उभे नाही त्यांचा पराभव करायचा बोलताय हे चुकीचं होतं असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देन टाळलं. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता गाडीमध्ये बसत निघून जाणच पसंत केलं.

गेला काही काळांमध्ये चंद्रकांत पाटील यांची वक्तव्य वादग्रस्त ठरले आहेत आणि त्याचा फटका पक्षला बसल्याचं दिसून आला आहे. आता बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्य महायुतीला किती महागात पडणार हे चार जूनलाच समोर येणार आहे. ज्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य धंगेकरांना उभारी देणारं ठरलं त्याचप्रमाणे ते वक्तव्य सुळेंच्या (Supriya Sule) पथ्यावरती पडणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

chandrakant patil sharad pawar ajia pawar
Ajit Pawar News : चंद्रकांतदादांनी बारामतीत येऊ नये, असे अजितदादांनी ठणकावून सांगितले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com