NCP Ajit Pawar News : निकालाने अजित पवार गटाच्या आमदारांची उडाली झोप!

Nashik Loksabha Election Analytsis : अजित पवारांच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीची झाली जबरदस्त पीछेहाट
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Nashik Lok Sabha Nivadnuk Nikal : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला आनंद झाला आहे. हे निकाल अजित पवार गटाच्या आमदारांची धडकी भरवणारे ठरले आहेत. नाशिक मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे विजयी झाले. विजयी उमेदवारांना कुठून मताधिक्य मिळाले. हे पाहिल्यास अजित पवार गटाला हा मोठा धक्का ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. या सर्व सहा आमदारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. सध्या ते महायुतीचे घटक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत या आमदारांनी महायुतीला किती मदत केली? हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक मतदारसंघात सिन्नरला माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि देवळालीत सरोज अहिरे या आमदार आहेत कोकाटेयांच्या सिन्नर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला तब्बल एक लाख 28 हजार मतांची आघाडी आहे. देवळाली मतदारसंघात 27 हजार 246 मतांची आघाडी आहे. या दोन मतदारसंघांच्या आघाडी एवढेच मताधिक्य शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांना मिळाले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या या दोन्ही आमदारांचा आगामी निवडणुकीत 'करेक्ट' कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे.

Ajit Pawar
Rajendra Phalke On Radhakrishna Vikhe : मतदारांनी धनशक्तीला 'पुष्पा स्टाइल' सुनावलं; 'राष्ट्रवादी'च्या फाळकेंनी विखेंना डिवचलं!

दिंडोरी मतदारसंघात अजित पवार गटाचे चार आमदार आहेत. या आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे भगरे यांना मोठी आघाडी आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघात 13 हजार 205, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी मतदारसंघात 82 हजार 308, निफाडचे बनकरयांच्या मतदारसंघात 18 हजार 184, कळवणचे आमदार नितीन पवारयांच्या मतदारसंघात 45 हजार मतांची आघाडी आहे.

Ajit Pawar
Nilesh Lanke: I can talk English, I can walk English; मी आता इंग्रजीत फडाफडा बोलत असतो!

अजित पवार गटाचे सर्वच आमदार राजकारणात पारंगत मानले जातात. त्यामुळे त्यांची भूमिका नेहमी पक्ष आणि संघटनेवरील निष्ठेपेक्षा राजकीय लाभ आणि सोय पाहून ठरत असते. लोकसभा निवडणुकीतही कदाचित त्यांनी सोयीचे दुर्लक्ष केले असावे. मात्र निवडणुकीच्या मतदानातून मतदारांनी व्यक्त केलेल्या कल आणि त्यांचे प्रश्न हे गंभीर आहेत. लोकसभेचा ट्रेंड विधानसभेतही कायम राहण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना तो आणखी बळकट होऊ शकतो. त्यामुळे निकालानंतर अजित पवार गटाच्या सर्वच आमदारांची झोप उडाली आहे. थोडक्यात या आमदारांना आता लोकसभेच्या निकालातून अलर्ट व्हावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com