Nashik News: गेली पाच वर्ष भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना आव्हान देत निवडणुकीची तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) सुधाकर बडगुजर यांना सहकारी पक्ष काँग्रेसनेच अपशकुन केला आहे. आता हा मतदारसंघ काँग्रेसला घेणार असे शहराध्यक्षांनी जाहीर केले. (Sudhakar Badgujar)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' मार्च महिन्यात नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहे. या यात्रेच्या तयारीसाठी आज सिडको येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले. या यात्रेनिमित्त समाजातील सर्व घटकांना जोडणे आणि बुथ स्तरावर यंत्रणा निर्माण करणे यावर सगळ्यांनी भर द्यावा,असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' नाशिक शहरातून जाणार आहे. सिडको भागातून राहुल गांधी यांची पदयात्रा होईल, त्यामुळे या भागात उत्साहाचे वातावरण झाले पाहिजे, त्यासाठी नाशिक पश्चिम मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, असे प्रयत्न करण्यात येतील. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी निश्चिंत असावे, असे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला माजी मंत्री डॉ.शोभाताई बच्छाव, पक्षाच्या प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील, शहराचे प्रभारी राजेंद्र बागुल, संतोष ठाकूर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा वंदना पाटील, स्वाती जाधव, सेवा दलाचे वसंत ठाकूर, गौरव सोनार, भालचंद्र पाटील, स्वप्नील पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातून या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा भक्कम मानला जातो. बडगुजर यांचा मोठा संपर्क आणि मतदार संघातील प्रभाव यामुळे महायुतीतील शिंदे गटानेही त्यांचा धसका घेतलेला आहे. या राजकीय वादातूनच त्यांच्या विरोधात खटल्यांचा ससेमीरा लावण्यात आला आहे. त्या सगळ्यांना बडगुजर पुरून उरले आहेत.
महाविकास आघाडीत नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला मिळेल, असे जवळपास निश्चित मानले जाते. असे असतानाच शिवसेनेच्या या मतांमध्ये मनसेचे दिलीप दातीर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून शेज लावली आहे. त्यात आता सहकारी पक्ष काँग्रेसने देखील पश्चिम मतदारसंघ पक्षासाठी घेणार, असा दावा करीत बडगुजर यांना राजकीय अपशकून केला आहे. त्यामुळे जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येईल, तसतसा आघाडीतील पक्षांमध्येच तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.