Congress News : रविभाऊ, आता कुठच्या Ex स्टॅडिंग चेअरमनला पाडायला निघालात, आधी आबा बागुलांना सांभाळा!

Political News : धंगेकरांना स्व:पक्ष कॉंग्रेसमधील नेते, स्टॅडिंग कमिटीचे माजी अध्यक्ष, आबा बागुलांनी इशारावजा भाषा करीत, धंगेकरांच्याच अडचणी वाढवल्या आहेत. अर्थात, धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध करीत, आबांनी धंगेकरांना बघून घेण्याचाच पवित्रा घेतला आहे.
aba Bagul , ravindra dhangekar
aba Bagul , ravindra dhangekar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : ‘मी अमूक माजी स्टॅडिंग कमिटीचे चेअरमनला पाडले, मी तमूक माजी महापौरांना पाडले, मी अशा खूप जणांना हरवलं, अशी भाषा करीत, भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळांचा ‘गेम’ करण्याचा चंग काँग्रेसचे उमेदवार, आमदार रवींद्र धंगेंकरांनी गुरुवारी रात्री मीडियाच्या कॅमेऱ्यापुढे बांधला आहे. त्यानंतर काही तास म्हणजे, २४ तास झाले नसतानाच, धंगेकरांना स्व:पक्ष कॉंग्रेसमधील नेते, स्टॅडिंग कमिटीचे माजी अध्यक्ष, आबा बागुलांनी इशारावजा भाषा करीत, धंगेकरांच्याच अडचणी वाढवल्या आहेत. अर्थात, धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध करीत, आबांनी धंगेकरांना बघून घेण्याचाच पवित्रा घेतला आहे. परिणामी, कसबा जिंकल्यानंतर अखख्या पुण्यावर ‘राज्य’ करण्यासाठी निघालेल्या धंगेकरांपुढे कॉंग्रेसमधूनच ‘स्पीडब्रेकर’ ठेवण्यात आला आहे.

आबा बागुल हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारीत होते. मात्र, ‘काना मागून आला तिखट झाला’ या म्हणीप्रमाणे आबांपुढे धंगेकर आल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी रवींद्र धंगेकराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. (Congress News)

aba Bagul , ravindra dhangekar
Prakash Ambedkar : आंबेडकर यांच्या वंचितला मिळणार नवीन चिन्हं !

आमदार रवींद्र धंगेंकरांनी गुरुवारी रात्री मीडियाच्या कॅमेऱ्यापुढे बोलताना शिवसेनेचे माजी स्टॅडिंग कमिटीचे चेअरमन रमेश घोडके, भाजपचे माजी स्टॅडिंग कमिटीचे चेअरमन गणेश बीडकर, विधानसभेला भाजपचे माजी स्टॅडिंग कमिटीचे चेअरमन हेमंत रासने यांचा पराभव केल्याचे सांगितले. त्यानंतर धंगेकराच्या विरोधात काँग्रेस नेतेच आता आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

एकेकाळी काँग्रेसकडून स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले आबा बागुल यांनी तातडीचे मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आबा बागुल यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध व न्याय मागण्यासाठी शनिवारी २३ मार्चला दुपारी ४ वाजता काँग्रेस भवन येथे मूक आंदोलन करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निष्ठावंताना डावलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या प्रवृत्ती विरोधात सर्वजण एकत्र येऊन मूक आंदोलनातून आपली ताकद दाखवू या, निष्ठावंतावरील अन्यायाविरोधात आवाज उठवू या, आपला न्याय मिळवू या. आता हीच वेळ आहे, काँग्रेस पक्ष वाचविण्याची, स्वार्थाचे राजकारण करून पक्षाची वाताहत करणाऱ्यांना मूक आंदोलनातून धडा शिकवण्याची, असा इशारा देत आबा बागुल यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाविरोधात रणशिंग फुंकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसऱ्या पक्षातून येऊन जेमतेम दीड वर्ष होत नाही ते आमदार झाले. मात्र, त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी (Loksabha Election Updates) देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत. मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) पराभूत झालेले आहेत. तसेच जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल (Aba Bagul) यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी फायनल असल्याचे पुढे आल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर आले होते. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पूर्वनियोजित बैठकीत लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे असा थेट सवाल करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना धारेवर धरले.

aba Bagul , ravindra dhangekar
Loksabha Election 2024 News : धंगेकरांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर; निष्ठावंतांना डावलल्याचा आबा बागुलांचा आरोप

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com