Loksabha Election 2024 : युती धर्मामुळे मंत्री विखे अडकले शिर्डीत; पुत्र खासदार सुजय नगरमध्ये एकटे पडले!

Radhakrishna Vikhe Patil पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे पुत्र भाजपचे उमेदवार खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराकडे गेल्या चार दिवसांत फिरकलेच नाही.
Sujay Vikhe patil, Radhakrishna Vikhe Patil
Sujay Vikhe patil, Radhakrishna Vikhe Patilsarkarnama
Published on
Updated on

Nagar News : राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे पुत्र भाजपचे उमेदवार खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराकडे गेल्या चार दिवसांत फिरकलेच नाहीत. यावर पालकमंत्री विखे यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिले. खासदार सुजय विखे यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर रेकाॅर्ड मताधिक्याने विजय होतील, अशी खात्री व्यक्त केली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या चार दिवसांपासून बैठकांचा झपाटा लावला आहे. बूथ कमिटीची बैठक घेतली. निवडणुकीत प्रत्येकाने साखळीपद्धतीने काम करा, अशा सूचना मंत्री विखे यांनी दिल्या. या चार दिवसांत त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात जेवढ्या बैठका घेता येईल, तेवढ्या घेण्यावर भर दिला.

संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी, चिंचपूर, जोर्वे, कोल्हेवाडी, राहाता तालुक्यातील रहिमपूर, कोल्हार, भगवतीपूर, कोरहाळे, आडगाव बुद्रुक अशा गावांमध्ये बैठका घेतला. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांनादेखील ठिकठिकाणी हजेरी लावली. शिवसेनेचे खासदास सदाशिव लोखंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचेदेखील उद्घाटन केले. गेली चार दिवस मंत्री विखे शिर्डी लोकसभा मतदारसंघात अडकून पडले आहेत.

Sujay Vikhe patil, Radhakrishna Vikhe Patil
Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना, रिपाइं अन् मनसेचा 'पत्ता कट'

मंत्री विखे शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरणाऱ्यावर माध्यमांनी त्यांना छेडले. तुमचे पुत्र खासदार सुजय विखे नगर दक्षिणमध्ये उमेदवारी करत आहेत. घराचा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असल्यावर सर्व कुटुंब त्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरते. परंतु तुम्ही सुजय विखे यांचा प्रचार सोडून तुम्ही गेली चार दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरत आहात, यावर तुम्हाला सुजय विखे यांच्या विजयाची गॅरंटी आहे का? या प्रश्नावर मंत्री विखे यांनी महायुतीचा धर्म सांगितला.

मंत्री विखे म्हणाले, "युतीचा धर्म आपण पाळतो. खासदार सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार आहेत. नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचीदेखील माझ्यावर जबाबदारी आहे". नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून सुजय विखे यांनी गेली पाच वर्षे काम केले आहे, त्यावरून ते रेकाॅर्ड मताधिक्याने ते विजयी होतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe patil, Radhakrishna Vikhe Patil
Nagar News : वंचितबरोबर तेच गुऱ्हाळ; महाविकास आघाडीला 'बहुजन मुक्ती'ने घेरलं

विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राळ!

शिर्डीतील पाणीप्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या पाणीप्रश्नावर बोलायला तयार नाहीत. निळवंडेचा पाणीप्रश्न वगळता इतर कुठल्याही पाणी मुद्द्यावर बोलताना हे दोघे दिसत नाहीत. वाकचौरे आणि लोखंडे यांनी परस्परांवर थेट वैयक्तिक गैरव्यवहारांचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. लोखंडे यांनी वाकचौरे यांचा शिर्डी संस्थानमधील तूप घोटाळा काढला आहे. वाकचौरे यांनी लोखंडे याचा सॅनिटरी नॅपकिनचा घोटाळा बाहेर काढला आहे. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप सोडता दोघेही विकासकामांवर चर्चा करत नाहीत.

Edited By : Umesh Bambare

R

Sujay Vikhe patil, Radhakrishna Vikhe Patil
Sujay Vikhe-Patil: सुजय विखेंच्या इंग्रजीवरून बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राची आठवण; मला इंग्रजी ना कळतं ना हिंदीही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com