Sharad Pawar On Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर शरद पवार बोलले, 'गेल्या दहा वर्षांत...'

Dhangar Reservation News : दोन समाजाने कटुता निर्माण होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणूनच मी या विषयावर अधिक बोलणे टाळतो. लोकांच्या विचारात सामंजस्य असावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama

Loksabha Election : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, म्हणून विविध संघटना आंदोलन करत होत्या. धनगर आरक्षणाची hangar Reservation याचिका नुकतीच सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टातदेखील कामय राहिला. धनगर समाजाला आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातून देण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात फेब्रुवारी सुनावणी झाली होती, तर शुक्रवारी (ता.19) सुप्रीम कोर्टाने या संदर्भातील याचिका फेटाळली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात भाष्य केले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar News : शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत चलबिचल होणार? विधानसभेचे गणित कसे ठरणार...

"केंद्र व राज्यामध्ये भाजपचे BJP सरकार आहे. त्यांनी न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यामुळेच त्याची किंमत धनगर समाजाला भोगावी लागली आहे. पूर्वी बारामतीच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे जाहीर केले होते. परंतु गेल्या दहा वर्षांत धनगर समाजाला ते आरक्षण देऊ शकले नाहीत आणि न्यायही देऊ शकलेले नाहीत", असे शरद पवार Sharad Pawar म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"दोन समाजाने कटुता निर्माण होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणूनच मी या विषयावर अधिक बोलणे टाळतो. लोकांच्या विचारात सामंजस्य असावे, अशी आमची अपेक्षा आहे", असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी आरक्षणाच्या संदर्भात सरकार सामंजस्याची भूमिका घेत नसल्याची अप्रत्यक्ष टीका केली आहे.

शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळा तसेच राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात काही आरोप केले. पण, त्यांनी हे आरोप कोणावर केले हे स्पष्ट करावे. ज्यांच्यावर हे आरोप केले आहेत ते त्याच्यासोबत गेले आहेत, असेदेखील शरद पवार म्हणाले.

R

Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : 'चार सौ पार'ची घोषणा भाजपसाठी ठरतेय 'इकडे आड तिकडे विहीर...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com