Loksabha Election 2024 : सर्वात 'सेफ' मतदारसंघात शरद पवारांची तोफ धडाडणार!

Sharad Pawar's first public meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली जाहीर सभा दि. 9 मार्च रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लासलगाव येथे होईल.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पहिली जाहीर सभा दि. 9 मार्च रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लासलगाव येथे होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे शरद पवार यांच्या सभेतच स्पष्ट होईल, अशी शक्यता दिसून येते.

बारामती (Baramati) नंतरचा सर्वात सेफ मतदारसंघ म्हणून शरद पवार नेहमीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पवार यांनी दिंडोंरीला प्राधन्य दिले असून ही सभा राज्याच्या राजकारणाला दिशा देणार, असा विश्वास महाआघाडीकडून व्यक्त केला जात आहे. सध्या मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर स्वपक्षासह महाआघाडीचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे.

Sharad Pawar
Loksabha Election 2024 : हेमंत गोडसे यांनी डिपॉझिट वाचवावे! संजय राऊत यांचा टोला...

कांदा निर्यातबंदी, द्राक्ष उत्पादकांची परवड, दुष्काळ तसेच बँकांकडून होणारे तगादे यामुळे दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) मतदारसंघात सत्ताधारी भाजपसह महायुतीबाबत शेतकरी संतप्त आहेत. महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसात हा मतदारसंघ पिंजून काढला. पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये हा मुद्दा ठसठसीत पद्धतीने समोर आला. यामुळे महाआघाडीच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

त्यातच दि. 9 मार्च रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभेचे आयोजन सुरू झाले. आज दुपारी महाआघाडीचे स्थानिक पदाधिकारी सभेची जागा निश्चित करतील. महाआघाडीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून, येथे पक्षाकडून इच्छुक असलेल्यांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार, हे देखील स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीतील पहिलीच जाहीर सभा महाआघाडीसाठी महत्वपूर्ण आहे. मागील तीन दिवसांमध्ये महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यांमध्ये पोहचून या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष प्रकर्षाने जाणवल्याचे मत शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपविण्याचे धोरण आखले असून, त्याचे पडसाद पदोपदी दिसतात. आता आमचे लक्ष सभेच्या नियोजनाकडे आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार हे आतापर्यंतच्या चर्चेनुसार स्पष्ट होते. दि. 9 मार्च रोजीच्या सभेवेळी उमेदवार कोण हे देखील स्पष्ट होऊ शकते, असे दिंडे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Sharad Pawar
Pradeep Naik : प्रदीप नाईक यांची 'फॅक्टरी' राजकीय अवसायनात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com