Baramati Lok Sabha News : बारामती लोकसभा उमेदवार कोण? सुनील तटकरेंचं मोठं विधान !

NCP Sunil Tatkare's big statement : लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा
Sunil Tatkare-Supriya Sule
Sunil Tatkare-Supriya SuleSarkarnama

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेचा उमेदवार नक्की कोण असेल, यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकाराला पाठिंबा जाहीर करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून उमेदवार देण्याचे जाहीर करत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हानच दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची ओळख आहे. शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात, तर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. गेली अनेक वर्षे केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजितदादा असे समीकरण तयार झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने उपमुख्यमंत्री पद दिलेल्या अजित पवार यांच्या मदतीने बारामतीवर विजय मिळविण्याचा निर्धार केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare-Supriya Sule
Pune NCP News : अजितदादांचा भाजपमध्ये 'वट' नाही राहिला; जवळच्याच कोणी केला हल्लाबोल?

बारामती लोकसभेला विजय मिळवायचा असेल, तर पवार यांच्या घरातीलच व्यक्तीला उमेदवारी असली पाहिजे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामाची माहिती देणारा रथ गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये फिरत असल्याने लोकसभा निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा बुधवारी शहरात पार पडला. त्यासाठी तटकरे आले होते.

लोकसभेच्या आगामी निवडणुका भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढणार आहे. सुनेत्रा पवार यांनी ही जागा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, अद्याप जागावाटपाचे कोणतेही सूत्र ठरलेले नाही. बारामती लोकसभेची जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. सुनेत्रा वहिनी गेली अनेक वर्षे मतदारसंघात काम करत आहेत, जागावाटप निश्चित झाल्यानंतर त्याचा निर्णय होईल.

Sunil Tatkare-Supriya Sule
Pune Politics News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला धमकी; जगताप यांची पोलिसांत धाव

लोक येत नाहीत म्हणणाऱ्याला 'ती' चपराक !

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला जात आहे. आतापर्यंत महिला, युवक, अल्पसंख्याक समाजाचे मेळावे झाले. आजपर्यंत मिळाला नाही, इतका प्रतिसाद या मेळाव्यांना मिळत आहे. या मेळाव्याला उत्स्फूर्तपणे लोक आले,आम्हाला लोक येत नाहीत म्हणणाऱ्याला ती चपराक होती, अशा शब्दांत तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका केली. आमच्या मागे अदृश्य शक्तीचा हात आहे, असे म्हणत असतील तर त्यांना नैराश्य आलं असावं. निवडणूक आयोगाने कायदेशीर पद्धतीने योग्य तो निकाल दिलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आमच्या पक्षात येत आहेत, असेही तटकरे म्हणाले.

Edited By : Chaitanya Machale

R

Sunil Tatkare-Supriya Sule
Modi Government : 'मोदी सरकार को हटाओ, भारत सरकार को बचाओ', कुणी लावले बॅनर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com