Narhari Zirwal News : शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयाने झिरवाळ यांची होणार अडचण?

Loksabha election Politics, Dindori constituency was given to NCP Sharad Pawar Group-महाविकास आघाडीच्या जागावाटपात दिंडोरी शरद पवार गटाकडे गेल्याने नेत्यांची होणार कोंडी
Narhari Zirwal & Sharad Pawar
Narhari Zirwal & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP Politics : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत राज्यात बहुतांश राजकीय पक्षांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अशा स्थितीत इच्छुक नेत्यांची हुरहुर वाढली आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ हेदेखील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार असल्याचे मानले जाते. (Loksabha election is much Important to all party, Ajit Pawar Group don`t have much Space)

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रातील ४८ पैकी ४६ जागांचे परस्परांत वाटप केले आहे. यामध्ये दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार (Sharad Paawr) गटाकडे आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या हेवीवेट नेत्यांची परीक्षा असेल.

Narhari Zirwal & Sharad Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांची अभिजित पाटलांना 'एअर लिफ्ट'!, बारामती-कापसेवाडी सफरीत नेमकी काय चर्चा ?

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे.

जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेला असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातील विधानसभेचे ‘राष्ट्रवादी’चे आमदार अजित पवार गटात गेलेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय खेळीने अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांची अडचण होईल. यातील काही नेते, विशेषतः नरहरी झिरवाळ यांच्याकडे इच्छुक उमेदवार म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे शरद पवार काय काय खेळी करतात, कोणाला रिंगणात उतरवितात, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे.

इंडिया आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केला.

Narhari Zirwal & Sharad Pawar
Sanjay Raut : ''शिवतीर्थावर स्मृतिस्थळी अफझलखानाच्या...'' ; शिंदे-ठाकरे गटातील राड्यानंतर संजय राऊतांचं विधान!

दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार हे चार आमदार आहेत. हे सर्व हेवीवेट नेते अजित पवार गटात गेले आहेत. सध्या अजित पवार गटा भाजपसोबत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार दिंडोरीचे प्रतिनिधित्व करतात. त्या विद्यमान असल्याने राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांनी आता भाजपसोबत की भाजपपासून अलिप्त यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. त्यात त्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी खेळलेली खेळी या सर्व नेत्यांची कोंडी करणारी ठरणार आहे.

Narhari Zirwal & Sharad Pawar
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा, मुस्लिम, धनगर, बंजारा एकत्र; जरांगे पाटलांनी बांधली मोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com